Nitin Gadkari Latest News
Nitin Gadkari Latest News  sarkarnama
देश

रस्ते अपघातांना कोण जबाबदार?; गडकरींनी केला खुलासा

सरकारनामा ब्यूरो

Nitin Gadkari: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा रविवारी (ता.५ ऑगस्ट) महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यामुळे भारतीय व्यापार क्षेत्रातून आणि अन्य क्षेत्रातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्नभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सोमवारी (ता.५ ऑगस्ट) रस्ते अपघातांसाठी सदोष प्रकल्प अहवालांना जबाबदार धरले आणि महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या बांधकामासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कंपन्यांना योग्य प्रशिक्षण मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ते नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते. (Nitin Gadkari Latest News)

गडकरी म्हणाले की, सरकार नवीन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. कंपन्यांनी तयार केलेले काही डीपीआर ( प्रकल्प अहवाल) अत्यंत वाईट आहेत, आणि ते रस्ते अपघातांना जबाबदार आहेत," असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

डीपीआर तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. तिथून सुरुवात करा. जर ते सुधारले नाहीत तर तुमचा संपूर्ण नायनाट होईल, असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, नवीन मर्सिडीज कार देखील अकुशल ड्रायव्हरच्या हातात अडचणी निर्माण करू शकते. तसेच रस्ते प्रकल्पांना होणाऱ्या विलंबाची कारणे शोधण्यावर भर दिला कारण विलंबामुळे बांधकामाचा वाढता खर्च ही देखील चिंतेची बाब असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये भारतभरात १.५५ लाखांहून अधिक लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला. दररोज सरासरी ४२६ किंवा प्रत्येक तासाला १८ आतापर्यंतच्या कोणत्याही कॅलेंडर वर्षात नोंदवलेला मृतांची संख्या सर्वाधिक आहे. गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या NCRB च्या अहवालात असे दिसून आले आहे की, गेल्या वर्षी अपघातांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या उच्चांक गाठला आहे. तर रस्ते अपघात आणि जखमींची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत कमी झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT