Vinesh Phogat Sarkarnama
देश

Vinesh Phogat : विनेश फोगट यांनी सांगितले राजकारणात येण्याचे कारण

Haryana Election Wrestling champion congress Candidate Vinesh Phogat : हरियणामध्ये आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा काँग्रेसला होणार असल्याने नवचैतन्य पसरले आहे.

Rashmi Mane

Haryana Election : ऑलिम्पिक स्पर्धा गाजवणारी धडाकेबाज कुस्तीपटू विनेश फोगाट हिने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकीय मैदानात उतरली आहे. आतापर्यंत कुस्तीच्या आखाड्यात उतरून भारतासाठी अनेक पदके जिंकल्यानंतर आता राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच विनेश फोगटला विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली. काँग्रेसने टाकलेल्या नव्या डावाने भाजप चांगलीच हैराण झाली असून हरियणामध्ये आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा काँग्रेसला होणार असल्याने नवचैतन्य पसरले आहे.

विनेश फोगाट हरियाणातील जिंदमधील जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विनेश फोगाटने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'तिने राजकारणात प्रवेश करण्याचा आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला'.

विनेश फोगाट मुलाखतीमध्ये म्हणाली, 'तिचा राजकारणात प्रवेश ठरवून झाला नसून मजबुरीमुळे झाला. 2024 च्या ऑलिम्पिकच्या परिस्थितीनंतर मला निवडणूक लढवण्याचा हा निर्णय घेण्यास भाग पाडले. लोकांची मागणी होती की मी त्यांच्यासाठी, त्यांच्या मुलांसाठी मी पुढे यावे, अशी मागणी लोकांनी केली. त्यामुळेच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.'

'राजकारण हा आपल्यासाठी पर्याय नाही, ती गरज आहे'

यापूर्वी विनेश फोगाट यांनी कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष व भाजप (Bjp) नेते ब्रिजभूषण यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. विनेश फोगट म्हणाली, "आम्ही रस्त्यावर लढलो, आम्हाला शिवीगाळ आणि अपमानांशिवाय काहीही मिळाले नाही. मी ऑलिम्पिकला गेले. मला न्याय मिळाला नाही. आम्हाला कधीच न्याय मिळाला नाही. राजकारणात प्रवेश करणे हा पर्याय नव्हता. तर ती एक गरज आहे."

'मी शिकेन आणि वेळेनुसार स्वतःला जुळवून घेईन'

विनेश फोगाट यांनी भाजपवर हल्लाबोल करताना म्हणाली की. " भाजप आमच्यावर मुस्लिम असल्याचा आरोप करतात, कधी म्हणतात आम्ही पाकिस्तानला समर्थन देतो, किंवा आम्ही खलिस्तानी आहोत. पण हे सर्व चालणार नाही. भाजपला स्वच्छ राजकारण करण्याची गरज आहे." राजकारणाच्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर विनेश म्हणाली की, सुरुवातीला प्रत्येक क्षेत्रात अडचणी येतात. कुस्तीच्या सुरुवातीला ज्या प्रकारच्या अडचणी होत्या, राजकारणही त्यापेक्षा वेगळे नाही, पण कालांतराने मी शिकेन आणि स्वत:ला जुळवून घेईन. लोकांना जाणून घेणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे हे माझ्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

'जुलाना लढवण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा निर्णय'

चरखी दादरी जागेऐवजी जुलानाची निवड करण्याच्या प्रश्नावर विनेश फोगाट म्हणाली की हा माझा निर्णय नसून काँग्रेस नेतृत्वाचा निर्णय आहे. परंतु संपूर्ण हरियाणाच्या विकासासाठी काम करणे हे माझे ध्येय आहे. मला विकास हा फक्त एका मतदारसंघापुरता मर्यादित ठेवायचे नाही. तर हरियाणासाठी तसेच युवा खेळाडूंसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर केंद्रित आहे. विशेषतः जे लैंगिक छळाचे बळी आहेत. कोणीतरी त्यांच्यासाठी उभा आहे, त्यांच्या हक्कांसाठी लढत आहे, असा विश्वास मला त्यांना द्यायचा आहे, असेही विनेश फोगाट यावेळी म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT