Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal For PM: केजरीवाल पंतप्रधानपदाचे दावेदार का? 'आप'ने दिली सबळ कारणे !

Chetan Zadpe

Delhi AAP News: मुंबईतील विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीपूर्वीच आम आदमी पार्टीने (आप)संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मोठी मागणी केली आहे. आम आदमी पक्षाच्या अधिकृत राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका कक्कड यांनी ही मागणी केली आहे. (Latest Marathi News)

केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याबाबत त्यांनी काही गोष्टींचा दाखला दिला आहे. केजरीवाल पंतप्रधान झाल्यास देशात कोणते बदल घडतील याचा पाढाही त्यांनी वाचून दाखवला. यानंतर केजरीवाल यांचे मंत्री गोपाल राय यांनीही केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची त्यांची पक्षाची इच्छा असल्याचे सांगितले.(Maharashtra Political Crisis)

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आपच्या प्रवक्त्या कक्कड यांनी ही मागणी करतानाच, केजरीवाल हे एकमेव नेते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान देणारा चेहरा म्हणून पुढे आले आहेत, असा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, "अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावे अशी माझी इच्छा आहे. देशात मोठी महागाई असताना दिल्ली हे सर्वात कमी महागाई असलेले राज्य आहे. इथे मोफत पाणी मिळते, मोफत चांगले शिक्षण मिळते. मोफत वीज उपलब्ध आहे. महिलांना मोफत प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा सुविधा मिळते. अरविंद केजरीवाल सातत्याने जनतेचे प्रश्न मांडतात. केजरीवाल हे पंतप्रधान मोदींना आव्हान देणारे नेते म्हणून समोर आले आहेत."

प्रियांका कक्करने आपली इच्छा व्यक्त करण्यासोबतच केजरीवाल पंतप्रधान झाल्यास देश किती बदलेल, याबाबतही भाष्य केले आहे. "भारताला नंबर वन बनवण्याचे आमचे ध्येय आहे. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की, जेव्हा आपण बाहेरून वस्तू खरेदी करतो तेव्हा महागाई देखील आयात केली जाते. त्यांच्याकडे आर्थिक दृष्टी नसल्याने हे घडत आहे. मॅन्युफॅक्चरिंग मायनसमध्ये गेले आहे." (Political Web Stories)

त्या पुढे म्हणाल्या, "केजरीवाल यांच्या व्हिजनमध्ये भारत मॅन्युफॅक्चरिंग हब होईल. व्यापार्‍यांना व्यवसायाची चांगली संधी मिळेल. जिथे शिक्षण इतकं उच्च दर्जाचं असेल की मुलं आविष्काराचा विचार करतील. जिथे महाविद्यालये अशी असतील की बाहेरून लोक डॉलर खर्च करून भारतात शिकायला येतील. आम्हाला असा भारत हवा आहे, जिथे 17 लाख कोटी रूपये भांडवलदार मित्रांची कर्जमाफी झाली असेल, या पैशाने किती राज्यांना मोफत वीज मिळाली असती, याचा विचार करा," असेही ते म्हणाले. (Political Short Videos)

आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक नेते गोपाल राय यांनीही प्रियंका कक्करचा मुद्दा पुढे केला. मात्र, याबाबतचा निर्णय युतीच घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गोपाल राय म्हणाले, "इंडिया आघाडी पंतप्रधान ठरवेल, तेव्हा केजरीवाल पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT