Arvind Kejriwal News:
Arvind Kejriwal News: Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवाल यांना अटक होणार? आपच्या गोटात हालचालींना वेग

सरकारनामा ब्युरो

Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना केव्हाही अटक होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे दिल्लीचे संयोजक गोपाल राय यांनी पक्ष कार्यालयात तातडीची बैठक बोलावल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी पक्षाच्या खासदार नेत्यांना आणि मंत्र्यांना ताब्यात घेतले आहे. सायंकाळी ५ वाजता आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव आणि नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. (Will Arvind Kejriwal be arrested)

दिल्ली पोलिसांनी आपचे खासदार संजय सिंह, आतिशी, सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा यांच्यासह पंजाब आणि दिल्ली सरकारच्या इतर कॅबिनेट मंत्र्यांना ताब्यात घेतले असून त्यांना नजफगडला घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी ' शांतता बाळगल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी आम्हाला अटक केली आहे आणि आम्हाला अज्ञात ठिकाणी नेले जात आहे, ही कसली हुकूमशाही? असे ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे. (Arvind Kejariwal Latest News)

आपचे नेते मनीष सिसोदिया यांना मद्य घोटाळा प्रकरणात काही दिवसांपूर्वी अटक झाली. या अटकेनंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही सीबीआयने समन्स बजावले आहेत. त्यानुसार आज ते सीबीआयच्या मुख्यालयात हजर झाले. त्यामुळे आता दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत येवून पोहोचला आहे. मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचीही सीबीआय चौकशी करणार आहे.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सरकार स्थापन करताना कोणताही विभाग स्वतःकडे ठेवला नाही. त्यांच्याकडे आलेल्या इतर विभागांच्या फायलींवरही त्यांनी कधीही सही केली नाही. अशा परिस्थितीत दारू घोटाळ्यासाठी त्यांना थेट जबाबदार धरणे फार कठीण आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इतर आरोपींच्या जबाबाच्या आधारेच त्यांना प्रथमदर्शनी आरोपी मानले जाऊ शकते. परंतु जर पैशांच्या व्यवहारात त्यांचा कोणताही हस्तक्षेप आढळला नाही तर तर केजरीवाल यांना थेट दोषी सिद्ध करणे कठीण होईल.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT