देश

Priyanka Gandhi and UP Politics: प्रियंका गांधी युपी'चे राजकारण सोडणार? 2024 च्या आधी होणार मोठे फेरबदल...

सरकारनामा ब्यूरो

Will Priyanka Gandhi Leave Uttar Pradesh Politics : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला उत्तर प्रदेश काँग्रेस संघटना (UP Congress) आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा प्रवास संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य संघटनेत मोठे बदल केले जाऊ शकतात, अशी चर्चा सध्या काँग्रेसच्या वर्तुळात सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. (Will Priyanka Gandhi leave UP politics)

मिळालेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशच्या संघटनेबाबत गेल्या वर्षभरात प्रियंका गांधींचे (Priyanka Gandhi) ज्या प्रकारे निष्क्रिय आहेत. याच दरम्यान, काळात गोखले मार्गावरील त्यांच्या निवासस्थानातून त्यांचे बरेच सामानही परत गेल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे या चर्चांना सध्या बळ मिळाल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीनंतर उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय नाहीत. गेल्या वर्षी जुलैपासून त्या प्रदेश काँग्रेस (Congress Politics) कार्यालयातही आलेल्या नाहीत.

अशा परिस्थितीत, त्यांची संघटनेतील भूमिका बदलणार असल्याचे स्थानिक पदाधिकांऱ्यामध्ये चर्चा आहे. इतर राज्यांमध्ये ते ज्या प्रकारे सक्रिय आहेत ते पाहता आता उत्तर प्रदेशातील संघटनात्मक हस्तक्षेपाची त्यांची भूमिका संपुष्टात येईल आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष राष्ट्रीय पातळीवर त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रियंका यांनी उत्तर प्रदेशच्या कारभारात ज्या प्रकारे निर्णय घेणे बंद केले होते, त्यामुळे त्या संघटने पासून दुरावल्या गेल्या. नगरपंचायत निवडणुकीपर्यंत हे अंतर कायम होते. यूपीच्या नुकत्याच पार पडलेल्या नागरी संस्थांच्या निवडणुकांमध्ये तसेच चंबे विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाने भाग घेतला, परंतु प्रियांका गांधी या निवडणुकीपासून दूरच राहिल्या. पण दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील पोटनिवडणुकीत त्या सक्रिय होत्या. तर त्यानंतर कर्नाटक निवडणुकीतही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. (National Politics)

दरम्यान, यूपी विधानसभा निवडणुकीनंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला होता. यानंतर बराच काळ प्रदेशाध्यक्षांची खुर्ची रिक्तच होती. त्यानंतर एक अध्यक्ष आणि सहा प्रांताध्यक्ष असा फॉर्म्युला घेऊन काँग्रेसने संघटनेची पुनर्बांधणी सुरू केली. मात्र, त्याचे चांगले परिणाम अद्याप समोर आलेले नाहीत.

शहरी मंडळाच्या निवडणुकीत संघटनेचे प्रांताध्यक्ष आणि राष्ट्रीय सचिवांमधील मतभेदही चव्हाट्यावर आले. त्याचा परिणाम निवडणुकीवरही झाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी युपीच्या राजकारणातून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

पण दुसरीकडे, प्रियांका गांधींची भूमिका केवळ यूपीपुरती मर्यादित न ठेवता त्या केवळ यूपीमधील संघटनेचे पद सोडणार असल्याचं बोललं जात आहे. यूपीच्या राजकारणात त्यांचा हस्तक्षेप सुरूच राहणार आहे. सक्रिय राजकारणात येण्यापूर्वीच प्रियांका अमेठी आणि रायबरेलीमध्ये सक्रिय होत्या. ही सक्रियता अबाधित राहील.त्यामुळे आगामी काळात त्या यापैकी कोणत्याही ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर ती फार आश्चर्यकारक गोष्ट ठरणार नाही.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT