Shashi Tharoor  Sarkarnama
देश

शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार ? महाराष्ट्रातील नेत्याचे नाव ही चर्चेत

Shashi Tharoor : गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी असावे, याबत राहुल गांधी ठाम आहेत.

सरकारनामा ब्युुरो

नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress President Election) पार पडणार आहे. 17 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत. अनेक दिग्गज इच्छुक आहेत. (Latest Marathi News)

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि केरळमधील तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणूकसाठी शशी थरूर गांभिर्याने विचार करत असल्याची माहिती आहे. मात्र अजूनही त्यांनी आपला अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. ते याबाबतत काही वरिष्ठ नेत्यांशी आणि आपल्या निकटवर्तीयांशी संवाद सल्लामसलत करत आहेत. लवकरच ते यासंदर्भात आपला निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इतरही काही नावं चर्चेत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याचे नाव चर्चेत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव आघाडीवर आहे. गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी असावे, याबत राहुल गांधी ठाम आहेत. शशी थरूर यांच्यासह प्रवक्ते मनीष तिवारी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचीही नावं चर्चेत आहेत.

17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान 22 सप्टेंबर रोजी या निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यार येणार आहे. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत अध्यक्षपदासाठी उमेदवारांचे अर्ज भरण्यात येणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणारी ही निवडणूक खुली आणि निकोप असणार आहे. या निवडणूकीत कोणीही भाग घेऊ शकतो. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांनाच अध्यक्षपदी राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण यासाठी राहुल गांधी तयार नाहीत. ते आपल्या निर्णयावर यावर ठाम आहेत. या निवडणुकीबाबतत माहीती देत असताना, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिलीय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT