PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
देश

Lok Sabha Exit Poll 2024 : नरेंद्र मोदी सत्तेत दिसू लागताच चीनकडून 'हिंदी-चीनी, भाई-भाई'चा नारा...

Pradeep Pendhare

Exit Poll 2024 Updates : देशातील लोकसभा निवडणुकीचा कल कसा राहिल, यावरील एक्झिट पोलची जगभरातील माध्यमांनी दखल घेतली. चीन सरकारचे मुखपत्र 'ग्लोबल टाईम्स'ने एक्झिट पोलची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यावर विदेशी रणनीतीवर भाष्य केले. जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी नरेंद्र मोदी चीनबरोबरचं संबंध अधिक सुधारतील, असा आशावाद व्यक्त केला.

चिनी तज्ज्ञांनी भारत आणि चीन यांच्यातील सहकार्यावर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा भर असेल, असावा दावा केला. दोन्ही देशांमधील मतभेद दूर होऊन खुल्या चर्चावर भर राहिल. तसेच लोकसभा 2024 ची निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे लक्ष भारताच्या आर्थिक विकासाला गती देण्याबरोबर जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्यावर लक्ष ठेवतील. यात चीनबरोबरच्या संघर्षावर त्यांना मार्ग काढावा लागेल, असे चिनी तज्ज्ञांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी भारताचे नेतृत्व करताना आर्थिक गोष्टींवर अधिक भर देतील, त्याशिवाय चीनसोबतचे संबंध सुधारण्याकडे त्यांचे लक्ष असेल. यासाठी त्यांनी दोन्ही देशांमध्ये संवाद वाढवावा लागेल. चीनसोबतच्या संबंधांबाबत भारताने धोरणात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारताने चीनला संवादाद्वारे मतभेद सोडवण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांच्यासमोर असणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात चीन आणि भारत यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता नाहीच, असे मत देखील चिनी राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात 2024 मध्ये स्थिर सरकार येण्याचा अंदाज येताच, चिनी तज्ज्ञांनी चीनचे इतर देशांबरोबर कसे संबंध सुधारत आहे, याकडे लक्ष वेधले. जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांसह चीनचे अनेक देशांशी संबंध आता सुधारल्याचे अधोरेखित केले. चीन इतर देशांचे संबंध सुधारवत असतानाच भारताने देखील चीनशी संबंध सुधारावेत.

याशिवाय चीन सरकारने देखील सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाकडे लक्ष वेधले. चीनने भारताबरोबर दीर्घकाळापासून सुरू असलेली परिस्थिती तातडीने सोडवण्याची गरज व्यक्त केली. जेणेकरून आमच्या द्विपक्षीय संबंधांमधील विकृती मागे राहून आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील, असे भाष्य तज्ज्ञांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT