<div class="paragraphs"><p>Tedros Adhanom Ghebreyesus</p></div>

Tedros Adhanom Ghebreyesus

 

Sarkarnama

देश

ओमिक्रॉन जीव घेतोय! डब्लूएचओ प्रमुखांचा जगाला धोक्याचा इशारा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : जगभरात कोरोना (Corona) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढत आहे. भारतातही कोरोना संसर्ग वाढीचा वेग चांगलाच वाढला असून, तिसरी लाट (Third Wave) आली आहे. यावरून आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगाला सावधान केले आहे. सुरवातीला ओमिक्रॉन हा सौम्य स्वरूपाचा असल्याचे संघटनेने म्हटले होते. आता तो रुग्णांना रुग्णालयात पोचवत असून, जीवही घेत आहे, असा धोक्याचा इशारा दिला आहे.

संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अॅडहानॉम घेब्रेयेसिस यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ओमिक्रॉनची बाधा मोठ्या विक्रमी संख्येने होत आहे. अनेक देशांमध्ये डेल्टा प्रकाराला मागे टाकून ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. अनेक देशांमध्ये रुग्णालयांमध्ये जागा अपुरी पडू लागली आहे. डेल्टापेक्षा ओमिक्रॉन हा आता सौम्य वाटत आहे. विशेषत: लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये तो सौम्य आहे. याचा अर्थ असा नाही की तो सौम्य आहे.

आधीच्या कोरोना विषाणूच्या प्रकारांप्रमाणे तो रुग्णांना रुग्णालयात पोचवत आहे आणि त्यांचे जीवही घेतोय. ओमिक्रॉनमुळे संसर्गाची सुनामी आली असून, ती अतिशय कमी कालावधीत आली आहे. जगभरातील आरोग्य यंत्रणा यामुळे कोलमडून पडल्या आहेत. मागील आठवड्यात 95 लाख नवीन कोरोना रुग्ण जगभरात नोंदवण्यात आले होते. त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत ही वाढ तब्बल 71 टक्के होती.

भारत सरकारच्या कोरोना लसीकरणविषयक टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.व्ही.के.अरोरा यांनीच देशात तिसरी लाट आल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी म्हटले होते की, देशातील ओमिक्रॉन रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. महानगरांमध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. मुंबई, दिल्ली आणि कोलकता या शहरांमधील 75 टक्के रुग्ण ओमिक्रॉनचे आहेत.

नॅशनल कोविड-19 सुपरमॉडेल कमिटीने तिसरी लाट नवीन वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज वर्तवला होता. या कमिटीचे अध्यक्ष विद्यासागर यांनी म्हटले होते की, भारतात ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. परंतु, ही लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल. तिसरी लाट भारतात पुढील वर्षीच्या सुरवातीला येईल. ही लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचेल. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या जास्त असणार नाही. कारण की सरकारने सामान्य नागरिकांना 1 मार्चपासून कोरोना लस देण्यास सुरवात केली. त्याचवेळी नेमका डेल्टाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग सुरू होता. म्हणजेच जनतेचे लसीकरण झालेले नव्हते त्यामुळे डेल्टाचा प्रादुर्भाव झाला होता. आता लसीकरणाचे प्रमाण खूप असल्याने रुग्णसंख्या पहिल्या लाटेपेक्षा कमी राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT