Xi Jinjping :
Xi Jinjping : Sarkarnama
देश

शी जिंगपिंग नजरकैदेत? खरोखरच कारवाई की नुसतीच अफवा?

सरकारनामा ब्यूरो

बिजिंग : चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिंगपिंग यांच्याबद्दल काही बातम्या प्रसारीत होत आहेत. जिंगपिंग बीजिंगमध्ये नजरकैदेत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. समरकंद येथील आंतरराष्ट्रीय परिषेदेसाठी ते उपस्थित होते तेव्हा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी लष्कराच्या प्रभारी पदावरून त्यांना काढले होते. त्यामुळे आता जिंगपिंग यांना नजरकैदेत ठेवल्याची माहिती प्रसारीत होत आहे.

शी जिंगपिंग यांच्यावरची नजरकैदेची कारवाई याबाबत ठोस माहिती नाही. त्यामुळे ही बातमी अफवा असल्याचेही बोलले जात आहे. अलीकडेच समरकंद येथे विविध देशांच्या सहभागातून आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. यासाठी शी जिंगपिंग हे देखील उपस्थित होते. या दरम्यानच्या काळात त्यांच्यावर चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी त्यांना लष्कराच्या प्रभारी पदावरून काढले होते, म्हणून त्यांच्यावर आता नजरकैदेची कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र अनेकांना ही अफवा वाटत आहे. याबाबत विश्वसनीय माहिती अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान यावर भाजपचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनीही टि्वट केले आहे. स्वामी यांनीही ही अफवा आहे का? असा सवाल उपस्ठित केले आहे. स्वामी टि्वट करत म्हणाले, नवीन अफवा तपासण्यासाठी - शी जिंगपिंग बीजिंगमध्ये नजरकैदेत आहेत का? अलीकडेच जेव्हा ते समरकंदमध्ये होते, तेव्हा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी त्यांनापक्षाच्या लष्कर प्रभारी पदावरून काढून टाकले होते. त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवल्याची अफवा पसरत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT