Yasin Malik Case Latest Marathi News
Yasin Malik Case Latest Marathi News sarkarnama
देश

फुटीरतावादी यासिन मलिकला जन्मठेप; NIA कोर्टाने सुनावली शिक्षा

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली ; काश्मीरमधील (jammu kashmir) फुटीरतावादी नेता यासिन मलिक (Yasin Malik) याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. एनआयए (NIA) न्यायालयाने आज (ता. २५) यासिन मलिकला शिक्षा सुनावली. मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती. (Yasin Malik Case Latest Marathi News)

एनआयए विशेष कोर्टाने 19 मे रोजी त्याला दोषी ठरवले होते. आज एनआयए न्यायालयात शिक्षेवर सुनावणी झाली. एनआयएने मलिकला फाशीच्या शिक्षेच्या मागणी केली होती. त्याच्या विरोधात देशविरोधी कारवायाचा आरोप होता. मलिक विरोधात 'युएपीए' कायद्यातील कलमांसह इतरही अनेक गुन्हे दाखल आहे.

यासिन मलिकने न्यायालयात सांगितले की, मला बुऱ्हान वाणीच्या चकमकीनंतर 30 मिनिटांत अटक करण्यात आली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी मला पासपोर्ट दिला होता. भारतात मला निवेदन सादर करण्यास सांगितले होते. मी गुन्हेगार नसल्याचे मलिकने कोर्टात सांगितले. मी 1994 मध्ये हिंसाचाराचा मार्ग सोडला आणि महात्मा गांधींच्या तत्वांवर चालण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून काश्मीरमध्ये अहिंसक आंदोलन करत असल्याचे मलिक याने न्यायालयात म्हटले होते.

एनआयएने मलिकसाठी कलम १२१ (सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे) अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती. मलिकने दिल्लीतील एनआयए न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर न्यायालयाने 19 मे पर्यंत सुनावणी टाळली होती. मलिकने न्यायालयात त्याच्या विरोधात लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणार नसल्याचे सांगितले होते. (Yasin Malik Case Latest Marathi News)

मलिक याच्या विरोधात युएपीए कायद्यातील कलम 16 (दहशतवादी कायदा), 17 (दहशतवादी कृत्यासाठी निधी उभारणे), 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) 20 (दहशतवादी टोळीचा सदस्य) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासिनने जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली जगभरातून बेकायदेशीर दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारला असल्याचे न्यायालयाने याआधी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT