जयपूर : गांधी कुटुंबातील (Gandhi Family) कुणीही काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदी नको, अशी जाहीर भूमिका काही ज्येष्ट नेत्यांकडून घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून यावरून काँग्रेसवर सातत्याने टीका केली जाते. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या असलेल्या एका अपक्ष आमदारानं थेट विधानसभेतच आपण गांधी-नेहरू कुटुंबाचा हगुलाम असल्याचा वक्तव्य केलं आहे. त्यावरून पुन्हा एकदा भाजपकडून (BJP) टीका सुरू करण्यात आली आहे.
राजस्थान (Rajasthan) विधानसभेत मंगळवारी अपक्ष आमदार संयम लोढा (Sanyam Lodha) यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. गेहलोत हेही गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत. विशेष म्हणजे लोढा हे यापूर्वी काँग्रेसमध्येच होते. त्यांचे तिकीट दोनवेळा कापण्यात आलं. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला. आता त्यांचे काँग्रेस सरकारला समर्थन आहे.
हरिदेव जोशी पत्रकारिता विद्यापीठ दुरूस्ती विधेयकावर चर्चा सुरू असताना लोढा यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, भाजपचे नेते आमच्यावर नेहमी आरोप करतात की, आम्ही गांधी-नेहरून कुटुंबाचे गुलाम आहे. आम्ही गांधी कुटुंबाच्या इशाऱ्यावर चालतो. त्यांना मी सांगू इच्छितो की, होय, मी गांधी कुटुंबाचा गुलाम आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत गुलाम राहीन.
गांधी कुटुंब नसते तर देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं नसतं, असं वक्तव्यही लोढा यांनी केलं. त्यावरून विरोधकांनी लोढा यांनी खिल्ली उडवली. त्यांच्या या विधानावर भाजप आमदारांना हसू आवरलं नाही. विरोधी पक्षाचे आमदार राजेंद्र राठोड म्हणाले, माझे गुलाम मित्र संयम लोढा यांचं वक्तव्य ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी बोलूही शकत नाही. यांचं वक्तव्य विधीमंडळ कामकाजातून हटवावं अन्यथा संपूर्ण राजस्थान त्यांना गुलाम म्हणेल, असा टोला राठोड यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.