Yati Narasinghanand Hate Speech
Yati Narasinghanand Hate Speech  
देश

यति नरसिंहानंदांच्या भडकाऊ भाषणाने खळबळ; मुस्लिम पंतप्रधान झाला तर....

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : हिंदुत्ववादी (Hinduttva) नेते यति नरसिंहानंद (Yati Narasinghanand) सरस्वती यांनी पुन्हा एकदा भडकाऊ भाषण केले असून, त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हरिद्वारनंतर आता यती नरसिंहानंद यांनी दिल्लीत (Delhi) भडकाऊ भाषण केल्याने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. (Yati Narasinghanand Hate Speech news)

रविवारी दिल्लीतील बुरारी येथे झालेल्या हिंदू महापंचायतीत त्यांनी भडकाऊ भाषण केले. या महापंचायतीत अनेक जण उपस्थित होते, अनेकांनी मंचावर आपले म्हणणे मांडले, मात्र यति नरसिंहानंद यांचे बोलणे वेगळेच होते. महापंचायतीत काही पत्रकारांशी त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

दिल्लीतील बुरारी येथील हिंदू महापंचायतीत बोलताना यति नरसिंहानंद बोलत होते. "2029 मध्ये या देशाचा पंतप्रधान मुस्लिम असेल. त्यानंतर हिंदूंच्या कत्तली होतील आणि हिंदूंना वाचवणारा कोणीही नसेल. इतकेच नव्हे तर द काश्मीरच्या फाइल चित्रपटाचा उल्लेख करत त्यांनी, काश्मिरींनी ज्याप्रमाणे आपली जमीन, मालमत्ता, बहिणी, मुली पळून नेल्या असेच दृश्य येत्या काळात पाहायला मिळेल. 2029 नाही तर 2034 तर हा नाही तर 2039 पर्यंत भारताचा पंतप्रधान मुस्लिम असेल. मुस्लिम (Islam) पंतप्रधान झाल्यास ५० टक्के हिंदू धर्मांतर करतील. ४० टक्के मारले जातील आणि बाकीच्या १० टक्के हिंदू शिबिरांमध्ये किंवा इतर देशांत पुढील २० वर्षे निर्वासित म्हणून राहावे लागेल, असेही नरसिंहानंद यांनी म्हटले.

राम मंदिराचा उल्लेख करत नरसिंहानंद म्हणाले की, न्यायालयीन लढाईनंतर आपण रामजन्मभूमी जिंकली आणि आता त्याठिकाणी मंदिरही बांधले जात आहे, पण या देशातील प्रत्येक मुसलमानाने शपथ घेतली आहे की, देशाचा निजाम निर्माण झाला की पहिले ते सर्वात आधी राम मंदिराचे नुकसान करण्याचे काम करतील. त्यामुळे तुमच्या बहिणी आणि मुलींच्या रक्षणासाठी हातात शस्त्रे ठेवा आणि खरा पुरुष तोच आहे जो हातात शस्त्र घेऊन त्यांच्यावर प्रेम करतो."

दरम्यान, हिंदू महापंचायत कव्हर करण्यासाठी गेलेल्या चार मुस्लीम पत्रकार आणि एका महिला पत्रकारांची ओळखपत्रे पाहिल्यानंतर तेथील लोकांनी त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचे मोबाईल आणि कॅमेरे हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांनी सर्व पत्रकारांना तेथून सुखरूप बाहेर काढल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.याप्रकरणी एका महिलेसह दोन पत्रकारांनी मुखर्जी नगर पोलीस ठाण्यात यती नरसिंहानंद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून महापंचायत घेणारे आणि प्रक्षोभक भाषणे देणाऱ्यांवर काय कारवाई केली जात आहे, याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT