Yogi Sarkar On Love Jihad Sarkarnama
देश

Love Jihad : 'लव्ह जिहाद' विरोधात योगी सरकार 'Action Mode'वर ; उत्तर प्रदेश विधानसभेत विधेयक मंजूर!

Mayur Ratnaparkhe

Uttar Pradesh Government on Love Jihad : उत्तर प्रदेश विधानसभेत मंगळवारी लव्ह जिहादशी निगडीत विधेयक मंजूर झाले. या विधेयकानुसार आता या प्रकरणातील आरोपाला जन्मठेपेच्या शिक्षेचीही तरतूद आहे. या कायद्यात अनेक गुन्ह्यांची शिक्षा वाढवून दुप्पट करण्यात आली आहे. लव्ह जिहाद अंतर्गत अनेक नवीन गुन्हे यासोबत जोडले गेले आहेत. मुख्यमंत्री योगींच्या नेतृत्वातील सरकारने याच्याशी निगडीत विधेयक सोमवारी सभागृहात सादर केले होते.

जाणून घ्या नवीन विधेयकात काय तरतुदी आहेत? -

1. नव्या कायद्यानुसार दोषी आढळल्यास 20 वर्षांचा तुरुंगवास किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.

2. आता कोणीही व्यक्ती धर्मांतरण प्रकरणी एफआयआर दाखल करू शकतो.

3. आधी या प्रकरणी माहिती किंवा तक्रार देण्यासाठी पीडित, आई-वडील किंवा भाऊ-बहीणीची उपस्थिती आवश्यक होती.

4. लव्ह जिहाद प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालया खालील कोणतेही न्यायालय करणार नाही.

5. लव्ह जिहाद प्रकरणी सरकारी वकिलास संधी दिल्याशिवाय जामीन अर्जावर विचार केला जाणार नाही.

6. यामध्ये सर्व गुन्हे अजामीनपात्र करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशच्या योगी(Yogi Adityanath) सरकारने लव्ह जिहादच्या विरोधातील पहिला कायदा 2020 मध्ये बनवला होता. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने विधानसभेत धर्मांतर बंदी विधेयक 2021मंजूर केले. या विधेयकात 1 ते दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद होती. या विधेयकात अशीही तरतूद होती की केवळ विवाहासाठी केले गेलेले धर्म परिवर्तन अमान्य ठरवले जाईल.

आधी दहा वर्षांच्या शिक्षेची होती तरतूद. उत्तर प्रदेशमधील जुन्या कायद्यानुसार खोटं बोलून, फसवून धर्म परिवर्तन करणं गुन्हा मानला जाईल. जर कोणी स्वच्छेने धर्म परिवर्तन करू इच्छित असेल, तर त्याला दोन महिने आधी न्यायाधीशास कळवावे लागेल. विधेयकानुसार जबरदस्ती किंवा फसवून धर्म परिवर्तन केले गेल्यास 15 हजार रुपये दंडास एक ते दीड वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद होती. या प्रकरणातही जर खटला दलित मुलीशी संबंधित असेल तर तेव्हा 25 हजार रुपये दंड आणि तीन ते दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद होती.

खरंतर केंद्र सरकारच्यावतीन धर्म परिवर्तन कायदा बनवण्यासंदर्भात आधीच स्पष्ट करण्यात आले आहे की, हा राज्य सरकारचा विषय आहे आणि याबाबतचा निर्णय तेथील सरकारनेच घ्यायचा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT