Congress Latest Marathi News
Congress Latest Marathi News Sarkarnama
देश

काँग्रेस नेत्यांचे निवृत्तीचे वय ठरले; सोनिया गांधीही झाल्या तयार?

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रेसचे तीन दिवसीय नवसंकल्प चिंतन शिबीर नुकतेच राजस्थानमध्ये पार पडले. या शिबीरात अनेक महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. युवक समितीनेही महत्वाची शिफारस केली आहे. पक्षातील नेत्यांचे निवृत्तीचे वय 65 करावे, असा प्रस्ताव या समितीने सादर केला होता. त्याला पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीही हिरवा कंदील दिल्याचे समजते. (Congress Latest Marathi News)

'एएनआय' या वृत्तसंस्थेनेे याबाबतचे वृत्त दिले आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा ब्रार यांच्या नेतृत्वाखालील समितीने निवृत्ती वयाबाबत शिफारस केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या कार्यकारिणीने (CWC) 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर याची अंमलबजावणी होऊ शकते, असं या वृत्तात म्हटलं आहे. (Youth Congress proposes 65 years as retirement age)

युवक समितीच्या 65 वर्षांच्या निवृत्ती वयाच्या शिफारशीवर सोनिया गांधी यांनीही मान्यता दिल्याचे या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, नऊ वर्षांनंतर उदयपूरमध्ये चिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 430 हून अधिक काँग्रेस नेते उपस्थित होते. ठराव निश्चित करण्यासाठी सहा समित्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये संघटनात्मक बदल, शेतकरी-कृषी, युवक, सामाजिक न्याय आणि आर्थिक आदी मुद्दांसाठी या समित्या होत्या. (Congress Chintan Shivir Latest Marathi News)

दरम्यान, शिबीरात 'एक परिवार एक तिकीट' च्या महत्वाच्या प्रस्तावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. नेत्याच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला तिकीट हवे असेल तर त्याने पक्षात किमान पाच वर्षे काम केलेले असावे, ही अट कायम ठेवण्यात आली आहे. यातून गांधी कुटुंबाचा मार्ग मोकळा करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

50 वर्षांखालील नेत्यांसाठी 50 टक्के पदं

पक्षात तरूणांना अधिकाधिक संधी मिळावी यासाठी 50 वर्षांखालील नेत्यांना 50 टक्के पदांवर नियुक्ती दिली जाणार असल्याचा महत्वपूर्ण ठरावही शिबीरात करण्यात आला आहे. मागील काही वर्षांत पक्षात तरूणांना संधी मिळत नसल्याचा आरोप अनेक तरूण नेत्यांनी केला होता. त्यातून काही नेते पक्षातूनही बाहेर पडले आहेत.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा

समारोपाच्या भाषणामध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी या यात्रेची घोषणा केली. ही यात्रा दोन ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या यात्रेमध्ये तरूण नेत्यांसह ज्येष्ठ नेतेही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं या यात्रेचे आयोजन केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT