Zohran Mamdani News : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युयॉर्कचे महापौर पदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. डोमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार, भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे न्युयाॅर्कचे महापौर झाले तर आपण न्यूयाॅर्कला देण्यात येणारा निधी रोखू, असा थेट धमकी ट्रम्प यांनी दिली होती. मात्र, या धमकीचा परिणाम झाला नाही. महापौर निवडणुकीत जोहरान ममदानी यांनी दणदणीत विजय मिळवला. ममदानी हे न्यूयाॅर्क शहराचे पहिले मुस्लिम महापौर झाले आहेत.
त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा आणि अपक्ष निवडणूक लढणारे माजी गव्हर्नर एंड्रयू क्योमा यांचा पराभव केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पक्षाच्या कर्टिस सिल्वा यांचा प्रचार न करता एंड्रयू क्योमा यांना पाठींबा दिला होता.
जोहरान ममदानी यांचा जन्म युगांडामध्ये झाला.वयाच्या सातव्या वर्षी ते न्युयाॅर्क शहरामध्ये आले. येथेच त्यांनी शिक्षण झाले. 2018 मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. त्याचे वय अवघे 34 वर्ष आहे.
भारताच्या प्रसिद्ध फिल्म निर्मात्या मीरा नायर आणि युगांडतील भारतीय वंशाचे लेखक महमूद ममदानी यांचे ते पुत्र आहेत. महमूद जोहरान हे मुळचे गुजरात मधील आहेत.
मे महिन्यात नरेंद्र मोदींबाबत जोहरान यांना एक प्रश्न विचारले असता त्यांनी मोदींवर टीका केली होती. ते म्हणाले की, मी गुजराती मुस्लिम असल्याचे सागंताच लोकांना आश्चर्य वाटते. माझे वडील एक गुजराती मुस्लिम कुटुंबातील आहेत. ते (पंतप्रधान मोदी) असे व्यक्ती आहेत, ज्यांनी गुजरातमधील मुस्लिमांचा सामुहिक नरसंहार करण्यासाठी मदत केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.