sandip patil
sandip patil 
धडाकेबाज

पुणे जिल्ह्यात आता ड्रोनचा वापर : घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिस शोधून आत पाठविणार

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती, लोणावळा, लोणी काळभोर, लोणीकंदसह जिल्ह्यातील प्रमुख मोठ्या गावात 'लॉकडाऊन' प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी ड्रोनचा वापर सुरू केला आहे. 

पहिल्या टप्प्यात बारामतीसह लोणी काळभोर, हवेली, लोणावळा, लोणी कंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख गावात रविवार (ता. 29) पासुन dron च्या मदतीने नागरीकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सुरूवात केली असुन, या काळात नाहक फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांनी दिली.

याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, याबाबतच्या सूचना वारंवार देऊनही, नागरिक त्याचे पालन करीत नसल्याचे आढळून आले आहे. पोलीस आपल्या भागात नसल्याची संधी साधुन अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्याने पोलिसांनी ड्रोनच्या साहाय्याने जिल्ह्यातील सर्वच मोठ्या गावात लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे. ड्रोनच्या पाहणीत एखाद्या ठिकाणी नागरीक घराबाहेर पडले असल्याचे लक्षात येताच, संबंधित ठिकाणी जाऊन पोलिस तात्काळ कायदेशिर कारवाई करणार आहेत.

रविवारी (ता. 29) लोणी काळभोर, बारामती, लोणावळा, वाघोली, नांदेड सिटी या गावात dron च्या मदतीने नागरीक घराबाहेर पडतात का याची पहानी करण्यात आली आहे. पुढील एक दोन दिवसात जिल्हामधील सर्वच मोठ्या गावात त्याचा वापर करण्यात येणार आहे. यापुढील काळात पोलीसांनी याबाबत कडक भूमिका घेण्याचे ठरवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT