अलिबाग : विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (ता. 23) लागणार आहे. रायगड जिल्ह्यातील सातही मतदारसंघातील युती-आघाडीत चुरस होण्याची शक्यता आहे. ही मोजणी सात ठिकाणी होणार असून दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील सात मतदारसंघात सुमारे दीड महिना प्रचाराचा धुरळा उडाला होता. त्यानंतर सोमवारी मतदान झाले. मतमोजणीला गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. टपाली मतांची मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान सर्व मतदारसंघातील निकाल हाती येण्याच्या दृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी प्रयत्न करीत आहेत.
विजयी मिरवणुका शांततेत काढाव्यात, अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिल्या आहेत. विधानसभा मतदारसंघात काही अपवादवगळता सर्व मतदान केद्रांवर शांततेत मतदान पार पडले. सरासरी मतदान 65.86 टक्के झाले आहे. 22 लाख 27 हजार 37 मतदारांपैकी 14 लाख 96 हजार 363 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
श्रीवर्धन : या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे आणि शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत श्रीवर्धनया ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
अलिबाग : शिवसेनेचे महेंद्र दळवी आणि शेकापचे आमदार पंडित पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली.या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
- महाड : माजी आमदार माणिक जगताप आणि आमदार भरत गोगावले यांच्यात प्रमुख लढत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
- कर्जत : आमदार सुरेश लाड यांना शिवसेनेचे महेंद्र थोरवे तुल्यबल झुंज देण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत थोरवे यांनी शेकाप पुरस्कृत उमेदवार म्हणून या मतदारसंघात लढत दिली होती. श्री साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय, किरवली, कर्जतया ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
- पेण : धैर्यशील पाटील यांना पुन्हा माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी आव्हान दिले आहे. ते या वेळी भाजपकडून रिंगणात उतरले आहेत.
के.ई.एस. लिटिल एंजल स्कू,झ्झिी गार्डनशेजारी, पेण या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
- उरण : या मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेकापचे माजी आमदार विवेक पाटील हे पुन्हा रिंगणात आहेत. शिवसेनेने आमदार मनोहर भोईर यांना पुन्हा रिंगणात उतरवले असून भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी या दोघांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
जिल्हा परिषद शाळा जासई,या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
पनवेल : भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. ते पुन्हा निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात शेकापने हरेश केणी यांना उतरवले आहे.
के.ई.एस. इंदूबाई वाजेकर इंग्लिश मीडियम विद्यालय, पनवेल या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.