Chagan Bhujbal Supporter Dilip Khaire Cried During Celebration 
फीचर्स

छगन भुजबळांच्या आनंदोत्सवात समर्थक दिलीप खैरे ढसढसा रडले!

छगन भुजबळ यांच्यासाठी 2014 च्या निवडणुकीनंतरचा पाच वर्षाचा कालावधी विविध संकटे घेऊन आला होता. यातील सत्तावीस महिने ते "इडी'च्या कारवाईने कारागृहात होते. यावेळी नाशिक, मुंबईत त्यांचे अनेक विश्‍वासु सहकारी कठीण काळात त्यांच्यासाठी कार्यरत होते. महात्मा फुले समता परिषदेचे दिलीप खैरे त्यापैकी एक आहेत.

सरकारनामा ब्युरो

नाशिक : छगन भुजबळ राज्याचे ग्रामविकास मंत्री झाले. त्यानंतर नाशिकला कार्यकर्ते, समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. धुमधडाक्‍यात फटाक्‍यांची आतषबाजी झाली. यावेळी भुजबळ यांचे समर्थक, अ. भा. समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप खैरे प्रतिक्रीया देतांना  सद्‌गदीत झाले. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. ते ढसढसा रडल्याचा व्हीडीओ राज्यभर व्हायरल झाला आहे. हा व्हीडीओ पाहून अनेक समर्थकांच्या मनात कालवा कालव झाली आहे.

छगन भुजबळ यांच्यासाठी 2014 च्या निवडणुकीनंतरचा पाच वर्षाचा कालावधी विविध संकटे घेऊन आला होता. यातील सत्तावीस महिने ते "इडी'च्या कारवाईने कारागृहात होते. या कालावधीत त्यांचे समर्थक, निकटवर्तीय असे मिरवून घेणाऱ्या अनेकांनी त्यांची साथ सोडली होती हे लपून राहिलेले नाही. मात्र, यावेळी नाशिक, मुंबईत त्यांचे अनेक विश्‍वासु सहकारी कठीण काळात त्यांच्यासाठी कार्यरत होते. महात्मा फुले समता परिषदेचे दिलीप खैरे त्यापैकी एक आहेत.

भुजबळ मंत्री झाल्यावर नाशिकला भुजबळ फार्म येथे कार्यकर्ते, समर्थकांनी आनंदोत्सव केला. यावेळी प्रतिक्रीया व्यक्त करतांना खैरे अचानक 'ब्लॅंक' झाले. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. संकटाच्या काळात साथ देणाऱ्यांचे आभार मानतांना ते बराच वेळ रडत होते.यावेळी महिला आघाडीच्या अनिता भामरे, माजी नगरसेविका कविता कर्डक, नाना महाले, संजय खैरनार, योगेश कमोद, श्रीराम मंडल आदी विविध पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT