Kolhe-Mahajan
Kolhe-Mahajan 
फीचर्स

 डॉ.अमोल कोल्हेंना फक्त पाहण्यासाठी लोक येतात एवढेच : गिरीश महाजन 

कैलास शिंदे

जळगाव :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनादेश यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आता विरोधकांना मिळणाऱ्या जागाचे बदलणारे आकडे  राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन  जाहिर करीत आहेत. त्यानुसार त्यांनी आज जळगावच्या जाहिर सभेत विरोधकांना केवळ आता तीसच जागा मिळतील असे भाकित केले आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज जळगाव जिल्ह्यात दाखल झाली. सागर पार्क मैदानावर जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना गिरीश महाजन म्हणाले, आमची यात्रा बघून विरोधकही यात्रा काढत आहे. परंतु आता जनता या नेत्यांचे तोंड पहायला येत नाही. नवीन निवडून आलेले खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना घेवून ते फिरत आहेत. छत्रपती संभाजी मालिकेत त्यांनी काम केलेले असल्याने त्यांना पाहण्यासाठी येतात एवढेच. बाकी राष्ट्रवादीची अवस्था बिकट झाली आहे.

 कॉंग्रेस तर व्हेंटीलेटवरच आहे. त्यामुळे यापूर्वी आपण आघाडीला चाळीस जागा मिळणार असे सांगितले होते. मात्र आता त्यात घसरण झाली असून त्यांना तीस जागाही मोठ्या मुश्किलीने  मिळतील असे चित्र आहे. आमच्या सरकारचे काम दमदार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत आम्हीच विजयी होवून पुन्हा सत्तेवर येणार याची आम्हाला खात्री आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT