फीचर्स

गर्व्हमेंट नोट ओव्हररुल करण्यात माझा हातखंडा : शरद पवार

यशपाल सोनकांबळे

पुणे : प्रसिद्ध लेखक अरुण साधू यांच्या सिंहासन कादंबरीवर चित्रपट काढण्याचे जेव्हा ठरले, तेव्हा दिग्दर्शक जब्बार पटेल आणि अरुण साधू यांनी मुख्यमंत्री निवासस्थान आणि कार्यालयात शुटींगची परवानगी मागितली. मी त्यावेळी मुख्यमंत्री होतो, मी परवानगी दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडुन सरकारी आस्थापने शुटींगसाठी देता येत नसल्याचे सांगत पानभर नोट पाठवली. पण  गर्व्हमेंट नोट ओव्हररुल करण्यात माझा हातखंडा असल्यामुळे तो नियम मी पाळला नाही,  असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सोमवारी केले.

लॉ कॉलेज रस्ता येथील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय येथे ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या गाजलेल्या झिपऱ्या कादंबरीवर आधारित अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत झिपऱ्या मराठी चित्रपट माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये खास शो चे आयोजन केले होते. यावेळी प्रतिभा पवार, राज्यसभा खासदार कुमार केतकर, जब्बार पटेल, मोहन आगाशे आणि मधुकर पिचड आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी पवार म्हणाले की साधू यांचे लेखन मराठी वाचकांच्या अंतःकरणाला भावणारी होती. साधू यांच्या सिंहासन कादंबरीवर चित्रपट काढायचं जेव्हा ठरले. तेव्हा हा चित्रपट ऑथेंटिक वाटावा म्हणून त्यांना मुख्यमंत्री कार्यलय आणि निवासस्थान इथे शूटिंग करायचे होते. याची चर्चा जेव्हा सुरू झाली. तेव्हा आमच्या 'जनरल एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट'ने हे कसे अयोग्य आहे. हे सांगण्यासाठी पानभर नोट पाठवली. पण नियमांना ओव्हररूल करण्याची माझी सवय असल्याने मी त्याकडे लक्ष दिले नाही. पण यामुळे एक आजरामर कलाकृती तयार झाली," असे सांगताच सभागृहात उपस्थितांनी टाळ्या आणि हास्याने दाद दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT