गावगप्पा

भिगवण पोलिसांचा सैराट डान्स ग्रामस्थांच्या पसंतीला

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : "कहते है करते है जो भी मर्जी, सुनते नही है किसी की अर्जी 
           ठाणे मे बैठे है ऑन डयुटी, बजावे हाय पांडे जी शिटी" 
 असे म्हणणारा दबंग चित्रपटामधील चुलबुल पांडे अनेकांना आठवत असेल.  त्याच प्रमाणे भिगवण येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीळकंठ राठोड यांनी सहकाऱ्यांसमवेत धरलेला ठेका  ग्रामस्थांना चित्रपटातील चुलबुल पांडेपेक्षाही अधिक भावला. पोलिस ठाण्यामध्ये बसविलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने पोलिसांनी बंदोबस्ताचा ताण झुकारुन देत नृत्याचा ठेका धरल्यामुळे नागरिकही यामध्ये मोकळेपणाने सहभागी झाले.

येथील भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. बुधवारी(ता.19) विसर्जन मिरणुकीचे आयोजन करण्यात आले होते. आरती झाल्यानंतर ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढली. मिरवणुकीच्या सुरुवातीलाच येथील ठाण्याच्या प्रांगणात  राठोड यांनी ठेका धरला व त्यामध्ये येथील सुमारे पन्नास पोलिसही सहभागी झाले. त्यामुळे ग्रामस्थांना सलमान खानच्या दबंगचीच आठवण झाली.

पोलिसांचे नृत्य पाहण्यासाठी भिगवणमधील नागरिकही मोठ्या संख्येने जमले होते. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. याबाबत सहाय्यक पोलिस निरिक्षक राठोड म्हणाले, पोलिसांवरील वाढत्या ताणांमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा उपक्रमांमधुन ताण करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमांमुळे पोलिस व समाज दोघांनाही आनंद मिळाला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT