shivrajsinh chouhan eating vadapaav at sonai
shivrajsinh chouhan eating vadapaav at sonai 
गावगप्पा

माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांना सोनईच्या वडापावची भुरळ

विनायक दरंदले

सोनई (नगर) :  मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कुटुंबासह शनिशिंगणापूरला भेट देऊन शनिमूर्तीचे दर्शन घेतले. येताना त्यांनी सोनईतील एका हातगाडीजवळ उभे राहून वडा-पावचा आस्वाद घेतला.

दर वर्षी शनिदर्शनासाठी येताना माजी मुख्यमंत्री चौहान वंजारवाडी येथे उसाचा रस घेतात, तसेच सोनईतील अशोका हातगाडीजवळ उभे राहून वडा-पावचा आस्वाद घेतात. आज रस्त्यावर गर्दी असतानाही त्यांनी वडा-पाव व लाल चटणीचा आस्वाद घेतला. अशोक व गणेश कुसळकर यांनी त्यांचा सत्कार केला.

दर वर्षी कुटुंब व नातेवाइकांसह चौहान साईबाबा व शनिदर्शनासाठी येतात. काल (मंगळवारी) रात्रीच ते शनिदर्शनासाठी आले होते. उदासी महाराज मठात त्यांनी स्वयंभू शनिमूर्तीला तैलाभिषेक केला. देवस्थानाच्या जनसंपर्क कार्यालयात विश्वस्त शालिनी लांडे व राजेंद्र लांडे यांनी त्यांचा सत्कार केला. मध्य प्रदेशातील जनतेला नवीन वर्ष सुखाचे जावो, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. येथील पानसनाला प्रकल्प सुंदर असल्याचे कौतुकही त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT