eknath shinde visits village
eknath shinde visits village 
गावगप्पा

मंत्री एकनाथ शिंदे रमले शेतात! मूळ गावात सत्कार

रविकांत बेलोशे

भिलार : दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) गावचे सुपुत्र नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे गावात आगमन होताच कोयनाकाठच्या या परिसराला अक्षरश मिनी मंत्रालयाचे स्वरूप आले आहे. मंत्रिपदाची झूल बाजूला सारून शिंदे यांनी आपले पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत स्वतःच्या शिवारात फेरफटका मारून शेतीत कामही केले.

दरे तर्फ तांब गावचे ग्रामदैवत उत्तरेश्वर यात्रेनिमित्त एकनाथ शिंदे हे गावी आले आहेत. आज दिवसभर त्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची रीघ लागली होती. यातूनही शिंदे यांनी वेळ काढून आपल्या वडिलांसह शेतीची पाहणी केली. त्यांनी बांधलेल्या शेततळ्याची पाहणी केली, तसेच या शेततळे व बंधाऱ्यालागत वृक्षारोपण केले. बंधाऱ्यात साठलेले पाणी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. बंधाऱ्याच्या काठावर झाडे आल्यास हा परिसर आणखी दिमाखदार होणार असल्याचे सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व आपल्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसोबत उत्तरेश्वर येथील यात्रेनिमित्त उत्तरेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी जाणार आहेत. रविवारी दरे ग्रामस्थ, मुंबईकर मंडळी व भागाच्या वतीने मंत्री एकनाथ शिंदे यांचा गावचे ग्रामदैवत जननीदेवी मंदिरात भव्य सत्कार करण्यात येणार आहे. त्या वेळी भारत गोगावले, आमदार मकरंद पाटील व नेते या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय प्रवीण भिलारे यांनी दिली.

मंत्री शिंदे कुटुंबीयांसह गावी मुक्कामी आल्याने कोयना विभाग फुलून गेला आहे. राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी शिंदे यांच्या भेटीला आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT