गावगप्पा

भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या बाजूला आमदार गोरे आणि माजी आमदार मोहिते

सरकारनामा ब्यूरो

चाकण : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे एका घरगुती कार्यक्रमासाठी चाकण येथे आले होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या एका बाजूला शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे व दुसऱ्या बाजूला माजी आमदार दिलीप मोहीते बसले होते. त्यावेळी दानवे यांच्याशी आमदार गोरे, माजी आमदार मोहीते यांनी हसतखेळत चर्चा केली.

एरव्ही एका व्यासपीठावर न येणारे आमदार गोरे, माजी आमदार मोहीते एका सोफ्यावर बसलेले पाहील्यानंतर हा फोटो मात्र काहींनी सोशल मिडीयावर व्हायरल केला. 

चाकण येथील भाजपचे युवा कार्यकर्ते संदीप सोमवंशी यांच्या पिंपरी-चिंचवड येथील एका घरगुती कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष दानवे आले होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याशी आमदार, माजी आमदारांनी चर्चा केली. पण खेड तालुक्यातील एकमेकांचे विरोधक असलेले नेते एका सोफ्यावर बसलेले पाहील्यानंतर उपस्थितांत वेगळीच चर्चा झाली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT