Sharad Pawar,  Nilash Lanke
Sharad Pawar, Nilash Lanke sarkarnama
फोटो फीचर

पुंडलिका भेटी परब्रह्म आले : पवारांच्या भेटीनंतर नीलेश लंकेची भावनिक पोस्ट

सरकारनामा ब्यूरो
Sharad Pawar

पारनेर (नगर) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड सेंटर सुरू करून आज तागायत हे कोविड सेंटर सुरू ठेवणारे आमदार नीलेश लंके (Nilash Lanke) सोशल मीडियामुळे राज्यभर प्रसिद्ध झाले आहे. त्यांची साधी राहणी. कार्यकर्त्यांत मिसळण्याची पद्धत व सर्वसामान्यात असलेली प्रतिमा यामुळे राज्यात चर्चेचा विषय ठरते.

Sharad Pawar

आमदार नीलेश लंके यांच्या घरी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या हंगे येथील घरी पवार यांनी त्यांच्या आई-वडिलांशीही चर्चा केली.

Sharad Pawar

या भेटीनंतर आमदार लंके यांनी आपली भावना एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, "साहेब, तुम्ही नगर जिल्ह्यात येणार आहात तर तुम्हाला घरी यायचंय" ही विनंती ऐकल्यानंतर पवार साहेबांनी हातातील कागदांवरुन नजर वर करुन विचारले, कुणाच्या घरी?

Sharad Pawar

माझ्याच घरी, मी उत्तर दिले. त्यासरशी साहेबांनी त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांना डायरीत तशी नोंद करायला सांगितली. त्यानंतर ते जेंव्हा अहमदनगर जिल्ह्यात आले तेंव्हा तिथल्या कार्यक्रमात त्यांनी मला खास जवळ बोलावून. "आपल्याला घरी जायचे आहे. तू माझ्या गाडीत बस, असे सांगितले.''

Sharad Pawar

''पुढचे काही क्षण जणू मंतरल्यासारखे होते. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन साहेब घरी आले...माझ्या आई-वडीलांसोबत त्यांनी संवाद साधला. आम्हा उभयतांना आशीर्वाद दिले. घर तस छोटंच आहे, वडीलांनी बांधलेल. त्याच घरात एका छोट्या खुर्चीवर साहेब बसले होते.

Sharad Pawar, Nilash Lanke

ते कितीतरी वेळ फक्त घराकडे बघत होते. माझ्या वडीलांना त्यांनी हाताला धरुन जवळ बसवून घेतल. घरात कार्यकर्त्यांची रीघ लागलेली होती. आमचा छोटेखानी सत्कार स्वीकारला. पुंडलिकाच्या भेटीला जणू परब्रह्म आल्याची ही भावना होती. जवळपास अर्धा तास साहेब घरी थांबले.''

Sharad Pawar

''जेंव्हा परतीची वेळ आली तेंव्हा आपण सर्वजण मिळून एक फोटो घेऊयात असे ते आवर्जून म्हणाले. साहेबांच्या सोबत एकाच फ्रेममध्ये येण्यासाठी भाग्य लागते. हे भाग्य त्या मंतरलेल्या क्षणांनी आम्हा सर्वांना लाभले. आम्ही कृतज्ञ आहोत. इयत्ता तिसरी-चौथीमध्ये असताना शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंनी डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला होता.

Sharad Pawar

आमदारकीच्या तिसरीत (तिसऱ्या वर्षाकडे जात असताना) पवार साहेबांनी त्यानंतर आज माझ्या घरी येऊन आम्हाला सहकुटुंब आशीर्वाद दिले. आयुष्याचे सार्थक झाले. जनसेवेसाठी झुंजण्याचे, लढण्याचे बारा हत्तींचे बळ अंगात आले,'' अशी भावना लंके यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT