VR Chaudhari (Right) sarkarnama
हवाई दलात तब्बल ३९ वर्षांचा दीर्घ अनुभव असलेले एअर चीफ मार्शल चौधरी यांनी हवाई दल अकादमीचे प्रमुख म्हणूही कार्य केले आहे.चीनने मागील वर्षी लडाखमध्ये भारताची कुरापत काढली तेव्हा ते हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख (कमांडिंग इन चीफ ) होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलाने पूर्व लडाखमध्ये आक्रमक मोहीम राबविली होती.एअर चीफ मार्शल चौधरी हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. इस्त्रोची सध्याची उपग्रह प्रणाली हवाई दलाच्या सर्व गरजा- आवश्यकता पूर्ण करू शकत नाही, असे त्यांनी नुकतेच सांगितले होते.मावळते हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदोरीया आणि चौधरी एका कार्यक्रमात नुकतेच एकत्र होते.मिग २९ लढाऊ विमानाचे सारथ्य करण्यात कौशल्य असलेले व चीन सीमेसह विविध आव्हानात्मक आघाड्यांवर भारतीय हवाई दलाचा झेंडा फडकत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे एअर चीफ मार्शल चौधरी यांनी मावळते प्रमुख आर के एस भदौरिया यांच्याकडून हवाई दलप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.मावळते हवाई दलप्रमुख भदोरिया आणि नवे हवाई दलप्रमुख चौधरी एका कार्यक्रमातहवाई दलात तब्बल ३९ वर्षांचा दीर्घ अनुभव असलेले एअर मार्शल चौधरी यांनी हवाई दल अकादमीचे प्रमुख म्हणूही कार्य केले आहे. चीनने मागील वर्षी लडाखमध्ये भारताची कुरापत काढली तेव्हा ते हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख (कमांडिंग इन चीफ ) होते. मावळत्या हवाई दलप्रमुखांना या वेळी निरोप देण्यात आला. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येणे व देशाच्या पश्चिम सीमेवर चीन-पाकिस्तान आघाडीवरील नवीन आव्हानांच्या सध्याच्या काळात चौधरी यांच्याकडे हवाई दलाची सर्वोच्च सूत्रे येणे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मावळत्या प्रमुखांना निरोप