Dhiraj Deshmukh news, Latur Latest Marathi News
Dhiraj Deshmukh news, Latur Latest Marathi News 
फोटो फीचर

अन् धीरज देशमुखांनी कॅमेऱ्यात टिपले पक्षांचे विश्व...

सरकारनामा ब्युरो
Dhiraj Deshmukh's Photography

लातूर (Latur) जिल्ह्यातील मसलगा तलावाच्या पाणथळ क्षेत्रात प्रथमच रंगीत करकोचाची वसाहत आढळून आली. रंगीत करकोचे गावात आढळून आल्याचे समजताच आमदार धीरज देशमुखांनी आपला कॅमेरा उचलला आणि थेट या ठिकाणालाच धडक दिली.

Dhiraj Deshmukh latest news

धीरज देशमुख यांनी पक्ष्यांच्या नानाविध छटा स्वतःच्या कॅमेरात टिपल्या. यानिमित्ताने कॅमेऱ्याच्या लेन्समधून पक्ष्यांचे सुरेल भावविश्व अनुभवत धीरज पक्षी निरीक्षणात रमले होते

Dhiraj Deshmukh

राजकीय नेत्यांना आपण कॅमेरासमोर सर्रास पाहतो. पण, कॅमेरामागे नाही. छायाचित्रण कलेवर प्रेम असल्याने आमदार धिरज देशमुख हे कॅमेरामागेही एका वेगळ्याच आत्मविश्वासाने पहायला मिळतात.

Dhiraj Deshmukh at Latur

आता ते लातूर जिल्ह्यातील मसलगा तलावाच्या पाणथळ क्षेत्रात रंगीत करकोचाचे छायाचित्र टिपण्यात रमल्याचे पहायला मिळाले.

Dhiraj Deshmukh click birds photo

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मसलगा तलावाच्या पाणथळ क्षेत्रात प्रथमच रंगीत करकोचाची वसाहत आढळली आहे.

Dhiraj Deshmukh

सध्या येथे सुमारे २५० रंगीत करकोचा त्यांच्या ४०० पेक्षा अधिक पिलांसह वास्तव्य करीत आहेत, असे समोर आले आहे. ही माहिती समजताच आमदार धीरज देशमुख यांनी संबंधित स्थळाला वन विभागाचे अधिकारी व पक्षी मित्रांसमवेत भेट दिली.

Dhiraj Deshmukh news

या पक्ष्यांचे वास्तव्य कायम रहावे म्हणून येथील शेतकरी गुंडाप्पा धनुरे यांनी शेतातील झाडांना कुऱ्हाड लावली नाही. त्यामुळे आमदार धीरज देशमुख यांनी यावेळी त्यांचे आवर्जून कौतुक केले.

Dhiraj Deshmukh at Latur

आपल्या भागात असलेल्या या पक्ष्यांचा अधिवास व त्याचे जतन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT