MP Supriya Sule News
MP Supriya Sule News Twitter/@SupriyaSule
फोटो फीचर

Supriya Sule 'खासदार केसरी' बैलगाडा शर्यतीत सुप्रिया सुळेंच्या हाती बैलगाडीचा कासरा...

सरकारनामा ब्युरो
MP Supriya Sule

बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर येथे काळूबाई देवीच्या यात्रेच्या निमित्ताने 'खासदार केसरी बैलगाडा शर्यत' आयोजित करण्यात आली होती. (MP Supriya Sule News Updates)

MP Supriya Sule

पुरंदर येथे काळूबाई देवीच्या यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या शर्यतींना खासदार सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली होती. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना मान्यता दिल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जात आहेत.

MP Supriya Sule

यावेळी सुप्रिया सुळेंना बैलगाडीचा कासरा हाती घेण्याचा मोह आवरला नाही. गेल्या काही वर्षांपासून बैलगाडा शर्यंतींवर बंदी घालण्यात आली होती.

MP Supriya Sule

सात-आठ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर मागील महिन्यात बैलगाडा शर्यंतीना सशर्त परवानगी देण्यात आली.

MP Supriya Sule

बैलगाडा शर्यत हा अस्सल मराठी मातीतील साहसी खेळ. ग्रामीण अर्थव्यवस्थेत या खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

MP Supriya Sule

मध्यंतरी काही वर्षे हा खेळ थांबला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सशर्त परवानगीनंतर तो पुन्हा सुरु झाला याचा आनंद आहे. अशा भावना यावेळी सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या.

वसा, वारसा आणि विचार समृद्ध कृषी परंपरेचा! असे ट्विट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT