विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजप उमेदवार आश्विनी लक्ष्मण जगताप यांनी प्रचाराला जोरात सुरूवात केली आहे.
विविध सोसायट्यांमध्ये जाऊन प्रचार सभा घेणे सुरू आहे.
पिंपरी- चिंचवड वासीयांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतं आहे.
चिंंचवडचे राहुल कलाटे अपक्ष उमेदवार यांच्या प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात झाली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक प्रचारादरम्यान परिसरामध्ये पदयात्रा काढण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रचारादरम्यान परिसरातील महिलांसोबत संवाद साधला.
महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी देखील परिसरामध्ये जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे.
पोटनिवडणूक उमेदवारांनी पदयात्रा करत मतदारांची भेट घेण्यावर जोर दिला.
नाना काटे यांचे अनेक कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.