मुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवून पहिल्या विमानउड्डाणाला सुरवात करून दिली. sarkarnama
या सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची राजकीय जुगलबंदी रंगलीया विमानतळामुळे मुंबई ते सिंधुदर्ग हा प्रवास स्वस्तात होणार आहे. राज्यातील बहुतांश नेते उदघाटन सोहळ्याला उपस्थित होते.महाविकास आघाडीतील शिवसेनेचा या कार्यक्रमावर प्रभाव होता.राणे आणि ठाकरे यांनी एकमेकांना कोपरखळ्या मारल्या. चिपी विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत आमदार नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री स्वतंत्र विमानाने या विमानतळावर आले. मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर केवळ एक तासात गाठता येणार आहे. केंद्रीय नागरी हवाईउड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे पहिल्या विमान प्रवासाचे तिकिट दाखवताना. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या विमानतळाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली. मुंबई ते सिंधुदुर्ग या प्रवासासाठी सुमारे अडीच हजार भाडे आकारण्यात येणार आहे. कोकणाच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा या वेळी सर्वांनी व्यक्त केली. गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू ही राज्ये थेट जोडली जातील. प्रदेशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल व रोजगाराच्या संधीही वाढतील, अशी अपेक्षा नारायण राणे यांनी व्यक्त केली.ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठीतून संपूर्ण भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.