शाहरुख खान आणि जुही चावला हे बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत आणि आवडत्या जोडींपैकी एक आहेत, ज्यांनी राजू बन गया जेंटलमन, येस बॉस, डुप्लिकेट, फिर भी दिल है हिंदुस्तानी, डर यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचीही मने जिंकली.
जुहीला ‘राजू बन गया जेंटलमन’ चित्रपटाची स्क्रिप्ट मिळाली होती. त्यावेळी तिला तिचा सहकलाकार कोण असेल याचीही उत्सुकता लागली होती.
चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिला शाहरुख आमिर खानसारखा दिसतो असे सांगितले होते. पण प्रत्यक्षात शाहरुखला पाहताच तिचा हिरमोड झाला होता, त्यावेळी शाहरुखला पाहताच तिने तोंंड वाकड केलं होतं, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.
चित्रपट सृष्टीत काम करताना शाहरुख आणि जूहीने अनेक चित्रपटात एकत्र काम केले. प्रेक्षकांनीही या जोडीला प्रंचड पसंती दिली. बॉलीवडूमध्ये काम करताना या दोघेही मैत्रीच्या घट्ट नात्यातही जोडले गेले.
जूहीने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दोघांनीही आपापल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. आम्ही आमची कारकीर्द जवळपास एकत्रच सुरू केली. शाहरुख माझ्यापासून जवळपास २-३ वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये आला. मात्र, त्यानंतर आम्ही सहकलाकार म्हणून एकत्र काम केले अनेकदा अपयशी झालो, पण शाहरुख कायम आपल्या सोबत होता.
शाहरुख आणि जुही यांच्यातील घट्ट मैत्री पाहून लोक त्यांच्या नात्यावर संशय घेऊ लागले होते. दोघांच्या अफेअरपर्यंत चर्चा होऊ लागल्या. अशा परिस्थितीत शाहरुखने जुहीसोबत पुन्हा चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या नात्यात या गोष्टींमुळे दुरावा येऊ नये आणि कोणीही दुखावले जाऊ नये, शाहरुखनेही त्यांची मैत्री वाचवण्याचा निर्णय घेतला आणि पडद्यावर एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला. जुहीनेही त्याला साथ देत त्यांच्या मैत्रीवर परिणाम होऊ दिला नाही.
संकटकाळातही हे दोघे एकमेकांच्या पाठीशी कायम उभे असतात आणि त्याचं उदाहरण आपण नुकतच पाहिलं. गेल्या २६ दिवसांपासून शाहरुखचा मुलगा आर्यन खान तुरुंगात होता. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आर्यन आज सुटका झाली. आर्यनच्या सुटकेसाठी जुही जामीनदार म्हणून हजर होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.