Ketaki Chitale 
फोटो फीचर

अभिनयापेक्षा केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमधून जास्त चर्चेत

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी गरळ ओकली आहे. केतकी अनेकदा अशा पोस्ट करत असते. या वेळी मात्र तिने हद्द ओलांडल्याची टीका होत आहे.

सरकारनामा ब्युरो
Ketaki Chitale

पण केतकीची अशी वादग्रस्त पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्रातील स्मारकाबद्दल केलेल्या भाष्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. प्रकरण वाढल्यानंतर अग्रिमाने माफी मागितली. त्यानंतर मात्र केतकीने त्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्याने शिवप्रेमी नाराज झाले होते.

Ketaki Chitale

त्यानंतर केतकीने पुन्हा सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये विविध धर्म-पंथांचा उल्लेख आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे केतकीविरोधात याआधी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. केतकीनं नवबौद्धांविषयी लिहिलेल्या विधानांवरुन नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते स्वप्नील जगताप यांनी तक्रार दाखल केली होती.

Ketaki Chitale

दरम्यान 9 मे रोजी शरद पवार यांनी साताऱ्यात एक भाषण केलं होतं. एका कार्यक्रमात शरद पवार यांनी एका कवितेचा संदर्भ आपल्या भाषणात दिला होता. या कवितेत त्यांनी हिंदू देव देवतांबाबत वक्तव्य केलं. शरद पवारांच्या या वक्तव्यांवरुन वाद सुरु असतानाच आता केतकीने शरद पवारांबाबत ज्या भाषेत फेसबुक पोस्ट लिहीली ती अनेकांना खटकली असल्याचं दिसत आहे. त्यातून आता केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT