Cannes Film Festival 2022 facebook/@AnuragThakur
फोटो फीचर

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर मंत्री अनुराग ठाकूर यांचा जलवा

फ्रान्समधील फ्रेंच रिव्हिएरा याठिकाणी आजपासून कान्स चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, चित्रपट आणि फॅशनची ओळख असणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवात २०२२ मध्ये भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ (country of honour) चा सन्मान मिळाला.

अनुराधा धावडे
Cannes Film Festival 2022

कान्स चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. महोत्सवातील अनेक क्षण त्यांनी आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

Cannes Film Festival 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय चित्रपटसृष्टीला आपला चित्रपट प्रवास, सिनेमाची उत्कृष्टता आणि भारतीय चित्रपटांची ताकद जगभर दाखवण्याची संधी मिळाली आहे. यंदाच्या कान्स महोत्सवात तामिळ, मराठी, मल्याळम आणि हिंदी भाषेतील 6 चित्रपट दाखवले जाणार आहेत.

Cannes Film Festival 2022

कान्स महोत्सवात मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह संगीतकार ए.आर. रहमान, ग्रॅमी विजेते रिकी केज, गीतकार प्रसून जोशी, शेखर कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, आर.माधवन यांसारखे कलाकार रेड कार्पेटवर दाखल झाले होते.

Cannes Film Festival 2022

यादरम्यान मंत्री अनुराग ठाकूर यांंनी मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकाचे सीईओ चार्ली रिव्हकिन यांच्याशीही संवाद साधला.

Cannes Film Festival 2022

कान्स महोत्सवात मंंत्री अनुराग ठाकूर यांनी पूर्णपणे भारतीय पोषाख परिधान केला होता. त्यांचे वस्त्र हा भारतातील विणकर समाजाला दिलेला सन्मान होता. यासोबतच खादी आणि हातमाग उद्योगाचे जगात मूल्य वाढल्याचा संदेशही त्यांनी यातून दिला.

Cannes Film Festival 2022

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या वेशभूषेत रेड कार्पेटवर येणे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या 'व्होकल फॉर लोकल' या आवाहनाचा जगात किती प्रभावी परिणाम होत आहे, हेच दिसून येते.

Cannes Film Festival 2022

याशिवाय कान्स चित्रपट महोत्सवादरम्यान अनुराग ठाकूर यांच्या वतीने महोत्सवात आलेल्या भारतीय शिष्टमंडळासाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT