Central Vista Project  
फोटो फीचर

अमेरिकेच्या दौऱ्यावरुन आल्यानंतर नरेंद्र मोदींनी केले 'हे' पहिले काम

अमेरिकेच्या दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री (२५ सप्टेंबर) संसदेच्या इमारतीचे बांधकाम पाहण्यासाठी गेले होते.

सरकारनामा ब्यूरो
Central Vista Project- Narendra Modi

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत (Central Vista Project) संसदेच्या नवीन इमारतीचे काम सुरु आहे. संसदेच्या नवीन इमारतीचे निर्माण कार्य सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी कामाच्या ठिकाणी भेट दिली.

Central Vista Project- Narendra Modi

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची घोषणा सप्टेंबर 2019 मध्ये करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी प्रकल्पाची पायाभरणी केली.

Central Vista Project- Narendra Modi

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन आणि नवीन निवासी संकुल बांधले जात आहे. यामध्ये, मंत्रालयाच्या कार्यालयासाठी अनेक नवीन कार्यालयीन इमारती आणि केंद्रीय सचिवालय, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानासह बांधले जात आहे.

Central Vista Project- Narendra Modi

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या संसद भवनाची नवीन इमारत सुमारे 65,400 चौरस मीटरमध्ये बांधली जात आहे. ही इमारत भव्य कलाकृतींनी परिपूर्ण असेल. इमारतीची रचना त्रिकोणी आकाराची असेल आणि तिची उंची जुन्या इमारतीइतकीच असेल.

Central Vista Project- Narendra Modi

संसदेच्या नवीन इमारतीत एक मोठे संविधान सभागृह, खासदारांसाठी विश्रामगृह, ग्रंथालय, अनेक समित्यांच्या खोल्या, जेवणाचे क्षेत्र असे अनेक विभाग असतील. विशेष म्हणजे, इमारतीतील लोकसभा चेंबरमध्ये 888 सदस्यांची आसन क्षमता असेल, तर राज्यसभेत 384 सदस्यांसाठी जागा असतील.

Central Vista Project- Narendra Modi

नरेंद्र मोदींनी या भेटी दरम्यान, बांधकाम साइटवर काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत कामाशी संबंधित माहितीही मिळवली. पीएम मोदींनी कामाची अत्यंत बारकाईने पाहणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT