Rajni patil  Sarkarnama
फोटो फीचर

रजनी पाटील : सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या 'लॉयल सोल्जर'

जम्मू काश्मिरच्या काँग्रेस प्रभारी माजी खासदार रजनी पाटील यांना काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी दिली.

अनुराधा धावडे

खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 'सोनिया गांधी यांच्या मान्यतेने उमेदवारी' ही उमेदवारी दिल्याची माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकूल वासनिक यांनी एका आपल्या पत्रात केला आहे.

Rajni patil

महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या यादीत रजनी पाटील यांचे नाव आहे. सोनिया गांधींनी राजकारणात प्रवेश केल्याच्या पहिल्या दिवसापासून रजनी पाटील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विश्वासू मानल्या जातात.

Rajni patil

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात एनएसयुआयमध्ये काम करताना त्यांनी एकदा राजीव गांधींचा केज दौराही घडविला होता. त्यावेळीच पहिल्यांदाच त्यांची सोनिया गांधींशी भेट आणि ओळख झाली.

Rajni patil

‘एनएसयुआय' च्या राज्य आणि राष्ट्रीय सचिव, पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या, कॉंग्रेसच्या महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा, खादी ग्रामोद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळालेला आहे.

Rajni patil

राज्यसभेतील कामात काही चुक झाली का, या प्रश्नावर ‘तुमचे काम उत्तम आहे, मी, राहूल आणि पक्षाकडे त्याची नोंद असून भविष्यातही आम्ही तुमची काळजी घेऊ असे म्हणू ‘यु आर माय लॉयल सोल्जर’अशी शाबासकी देत त्यांच्या डोक्यावरुन आणि पाठीवरुन आपुलकीचा हात सोनियांनी फिरवला होता.

Rajni patil

रजनी पाटील यांच्या पुढाकाराने आठवडाभरापूर्वीच राहूल गांधी यांचा जम्मू काश्मिर दौरा झाला. हा दौरा आणि रजनी पाटील यांचे भाषण चर्चेत असतानाच आता राहुल व सोनिया गांधी यांनी त्यांना राज्यसभेवर पुन्हा संधी दिली.

Rajni patil

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT