Ramesh Bais New Governor of Maharashtra Sarkarnama
फोटो फीचर

Ramesh Bais Governor of Maharashtra : रमेश बैंस आजपासून महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, पाहा फोटो

अनुराधा धावडे
Ramesh Bais New Governor of Maharashtra

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर आज (१८ फेब्रुवारी) रमेश बैंस यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.

Ramesh Bais New Governor of Maharashtra

राजभवनात रमेश बैंस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यांनी मराठीतून शपथ घेतली.

Ramesh Bais New Governor of Maharashtra

शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) सांयकाळीच त्यांचे मुंबईत आगमन झाले. राजभवनात त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी करण्यात आली होती.

Ramesh Bais New Governor of Maharashtra

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश एस.व्ही. गंगापूरवाला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, प्रमुख मान्यवर आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन राज्यपालांना पदाची शपथ दिली.

Ramesh Bais New Governor of Maharashtra

झारखंडचे राज्यपाल असलेले ७५ वर्षीय बैस यांची गेल्या रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली.

Ramesh Bais New Governor of Maharashtra

काल (१७ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सांयकाळी सपत्नीक रमेश बैंस यांचे मुंबई विमानतळावर दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Ramesh Bais New Governor of Maharashtra

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनीदेखील  बैस यांचे स्वागत केले.

Bhatasingh koshyari

दरम्यान, नौदलाच्या मानवंदनेत मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनातून निरोप देण्यात आला. त्याआधी देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी कोश्यारी यांची भेट राजभवनात जाऊन भेट घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT