Shivsena leader Aditya Thackeray
Shivsena leader Aditya Thackeray Twitter
फोटो फीचर

आदित्य ठाकरेंना घेवून मिलींद नार्वेकर तिरुपतीला : महत्वाच्या बैठकीला दोघांचीही दांडी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल शिवसनेच्या प्रवक्त्यांसह खासदारांंची बैठक घेतली. मात्र या बैठकीला राज्याचे मंत्री आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर अनुपस्थित होते. त्याचे कारण देखील तेवढेच खास आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना घेवून शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी (Milind Narvekar) दोन दिवसांसाठी दक्षिण भारत गाठला आहे. तिकडे व्यंकटेश्वराच्या दर्शनापासून तिरुमला तिरुपती देवस्थानच्या कार्यक्रमांना आदित्य ठाकरेंना नेत नार्वेकरांनी विश्वस्त सहकाऱ्यांवर छाप पाडली आहे.

Shivsena leader Aditya Thackeray

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दोन दिवसांसाठी दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहे. काल पद्मावती देवीच्या दर्शनाने या दौऱ्याची सुरुवात झाली.

Shivsena leader Aditya Thackeray

कटेश्वराच्या दर्शनापासून तिरुमला तिरुपती देवस्थानच्या कार्यक्रमांना आदित्य ठाकरेंना नेत नार्वेकरांनी विश्वस्त सहकाऱ्यांवर छाप पाडली.

Shivsena leader Aditya Thackeray
Shivsena leader Aditya Thackeray

नार्वेकरांच्या हट्टापायी आदित्य ठाकरेंना शिवसेना खासदारांच्या बैठकीला दांडी मारावी लागल्याची चर्चा अधिकच रंगली आहे.

Shivsena leader Aditya Thackeray

खासदारांची बैठक सुरू होण्याआधी आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण आणि राहुल कनाल हे खासगी विमानाने तिरुपतीला पोचले.

Shivsena leader Aditya Thackeray

दर्शन आटोपल्यानंतर त्यांनी विश्वस्तांसोबत चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेडी यांची आदित्य ठाकरे आणि नार्वेकरांनी भेट घेतली.

Shivsena leader Aditya Thackeray

देवस्थानला नवी मुंबईत दिलेल्या जागेसह प्रत्यक्ष कामाबाबत त्यांच्याच चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आदित्य मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT