Lal Chowk
Lal Chowk  Sarkarnama
फोटो फीचर

Lal Chowk : श्रीनगरच्या लाल चौकाचे भारतीय राजकारणातील महत्त्व, एकदा जाणून घ्याच

अनुराधा धावडे
Lal Chowk

श्रीनगरचा लाल चौक काश्मीरच्या राजकारणाचा, आंदोलनाचा आणि दहशतवादाचा साक्षीदार आहे. लाल चौक इतिहासातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा साक्षीदार आहे. पण सध्या कॉंग्रेस खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे आणि तिरंगा फडकवण्याच्या विषयावरुन लाल चौक चर्चेत आला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का लाल चौकात तिरंगा कधी आणि कोणी फडकवला होता?

Lal Chowk

काश्मीर आणि भारतीय राजकारणात लाल चौकाचे विशेष महत्त्व आहे. लाल चौकाला श्रीनगरची शान म्हटले जाते. काँग्रेस पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप इत्यादी राज्यातील आणि देशातील प्रमुख पक्षांच्या राजकीय मिशनसाठी लाल चौकाला विशेष महत्त्व आहे.

Lal Chowk

Sarkarnama इतिहासाची पाने उलटली तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी लाल चौकात तिरंगा फडकवला होता. त्यांच्यासोबत तत्कालीन जम्मू-काश्मीर संस्थानाचे प्रमुख शेख अब्दुल्लाही होते.

Lal Chowk

या घटनेनंतर प्रदीर्घ काळानंतर 1992 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली लाल चौकात तिरंगा फडकवण्यात आला.

Lal Chowk

लाल चौकाच्या इतिहासानुसार, राष्ट्रीय सण आले की लाल चौकात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाते. दहशतवादी हल्ल्यांच्या धोक्यामुळे लाल चौकात तिरंगा फडकवणे सोपे नाही.

Lal Chowk

मुरली मनोहर जोशी यांच्या ध्वजवंदनालाही महत्त्व होते, कारण लाल चौकात घड्याळाचा टॉवर उभारल्यानंतर येथे तिरंगा फडकवण्यात आला नाही.

Lal Chowk

श्रीनगरच्या लाल चौकाला मॉस्कोच्या रेड स्क्वेअरचे नाव देण्यात आले. 1980 मध्ये येथे घड्याळाचा टॉवर बांधण्यात आला. लाल चौकाचे नामकरण करण्यात डाव्या नेत्यांचे महत्त्वाचे योगदान होते.

Lal Chowk

पुढे लाल चौक क्रांती आणि परिवर्तनाचे प्रतीक बनले. सध्या जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर राज्यात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

Lal Chouk Kashmir

लाल चौकात तिरंगा फडकावण्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्येही राजकारण सुरू झाले आहे. लाल चौकात तिरंगा फडकवणे हा आरएसएसचा अजेंडा असल्याची टिप्पणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. लाल चौकात राजकारण करणे योग्य नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT