शुक्रवारी (११ फेब्रुवारी) सकाळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरळी परिसरातील विकासकामांची पाहणी केली. विशेष म्हणजे अजित पवारांच्या वाहनाचे सारथ्य स्वत: आदित्य ठाकरे करत होते.
सकाळी सात वाजल्यापासून या दौऱ्याला सुरुवात झाली होती, पण बराचवेळ प्रसारमाध्यमांना या दौऱ्याची कोणतीही माहिती नव्हती.
अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात तसेच दादर आणि माहीम येथील टॅक्टिकल अर्बनिझम अंतर्गत केल्या जाणाऱ्या विकासकामांचीही पाहणी केली.
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. विशेष म्हणजे वरळी मतदारसंघातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अजित पवार हे दोघे एकाच गाडीतून आले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह वरळी परिसरातील महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी आणि धोबी तलाव परिसरातील प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी अजित पवार आणि आदित्य ठाकरे अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. विशेष म्हणजे वरळी मतदारसंघातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अजित पवार हे दोघे एकाच गाडीतून आले होते. यावेळी अजित पवार यांनी आदित्य वरळी मतदारसंघाचा आढावा अजित पवार यांनी घेतला.
अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी आणि धोबी तलाव परिसरातील प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी अजित पवार आणि आदित्य ठाकरे अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
अजित पवारांनी दादरमधील व्युइंग डेकची आणि वरळी सीफेसचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी वरळी मतदारसंघातील विकासकामांचं आणि सौंदर्यीकरणाचं कौतुक केलं. तसेच दुरुस्तीच्या कामांचीही माहिती घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.