Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra  
फोटो फीचर

तोड़ दो नफ़रत की दीवारें..;भारत जोडो यात्रेचे 'हे' फोटो तुमच्याही काळजाला भिडतील

अनुराधा धावडे
Bharat Jodo Yatra

ही यात्रा म्हणजे 'पदयात्रा' असून ती कन्याकुमारी ते काश्मीर अशी केली जाणार आहे. तामिळनाडूतून या यात्रेला सुरुवात झाली.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra

देशातील ज्या राज्यांतून ही यात्रा जाणार नाही अशा राज्यांतून 100-100 लोक या प्रवासात सहभागी झाले असून हे लोक "पाहुणे प्रवासी" आहेत. तर ज्या राज्यातून ही पदयात्रा जाणार आहे त्या राज्यातूनही 100-100 लोक या प्रवासात सामील झाले आहेत. या लोकांना "राज्य प्रवासी" म्हटले जाईल.

Bharat Jodo Yatra

भारत जोडो यात्रा हा भारताच्या एकतेचा उत्सव आणि आशेचा उत्सव आहे ज्यामध्ये भारतातील सर्व लोक सहभागी होऊ शकतात. भीती, धर्मांधता, वाढती बेरोजगारी आणि समाजात पसरणारी विषमता याविरोधात ही पदयात्रा काढण्यात आली आहे.

Bharat Jodo Yatra

150 दिवस म्हणजेच 5 महिने चालणारी ही पदयात्रा दोन शिफ्टमध्ये नियोजित करण्यात आली आहे. पहिली शिफ्ट सकाळी 10.30 वाजता आणि दुसरी शिफ्ट पहाटे 3.30 वाजता. एका दिवसात 22 ते 23 किमी अंतर कापण्याची योजना आहे.

Bharat Jodo Yatra

राहुल गांधींच्या नेतृत्त्वात निघालेली ही भारत जोडो यात्रा कर्नाटकपर्यंत पोहचली आहे. आजच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यादेखील या यात्रेत सहभागी होण्यासाठी कर्नाटकात पोहचल्या.

Bharat Jodo Yatra

राहुल गांधींंनी आज कर्नाटकातील मस्जिद-ए-आजम आणि प्रसिद्ध सेंट फिलोमेना चर्चला भेट दिली. त्याआधी त्यांनी मैसुर येथील एक हजार वर्ष जुन्या सुत्तूर मठालाही भेट दिली .

Bharat Jodo Yatra

1. महंगाई से नाता तोड़ो, मिलकर भारत जोड़ो, 2. बेरोजगारी का जाल तोड़ो, 3. भारत जोड़ो, नफरत छोड़ो, भारत जोड़ो, 4. संविधान बचाएंगे, मिलकर भारत जोड़ेंगे, 5. मिले कदम, जुड़े वतन, या घोषणा देण्यात येत आहेत.

Bharat Jodo Yatra

राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा नुकतीच तामिळनाडू, केरळमधील प्रवास पूर्ण करुन कर्नाटकमध्ये पोहोचली आहे. आपल्याला भारताला जोडायचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. बेरोजगारी, रोजगाराचा मुद्दा काँग्रेस मांडत राहील. भरपावसात देखील राहुल यांच्या सभेला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. आपल्याला भारताला जोडायचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT