P. T. Usha Sarkarnama
फोटो फीचर

P. T. Usha: 'तीन' ऑलिम्पिक गाजवणारी 'उडन परी' राज्यसभेची अध्यक्ष ; पाहा फोटो

Rajya Sabha vice-chairpersons : पी. टी. उषांनी पाहिलं राज्यसभेच्या अध्यक्षा पदाचं कामकाज

सरकारनामा ब्यूरो
P. T. Usha

धावपटू पिलावुल्लाकांडी थेक्केपारंबिल उषा उर्फ पी. टी. उषा यांनी पहिल्यांदाच राज्यसभेचे अध्यक्ष म्हणुन काम पाहिलं.

P. T. Usha

राज्यसभेचे अध्यक्ष व उपसभापती जगदीप धनखड यांच्या अनुपस्थितीत कामकाज पाहिलं आहे. 

P. T. Usha

राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने पी.टी. उषा यांची नियुक्ती करण्यात आली होती.

P. T. Usha

त्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी सर्वत्र ओळखल्या जातात, तसेच त्यांचे नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे कामही तितकेच कौतुकास्पद आहे. त्यामुळेच राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आले आहे.

P. T. Usha

उषा यांचा जन्म केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला. यांनी अॅथलेटिक्समध्ये भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना 'उडन परी' अशी नवी ओळख मिळाली. त्यांनी तीन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

P. T. Usha

ज्या मुलींना क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्या मुलींसाठी उषा या प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम केले आहेत.

P. T. Usha

उषा यांना 'उडन परी' यासोबतच 'पय्योली एक्सप्रेस', 'गोल्डन गर्ल' अशा नावांनीही ओळखले जाते. त्यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी १९८६ मध्ये सेऊल आशियाई क्रीडा स्पर्धेत ४ सुवर्ण पदकांसह एक रौप्य पदक जिंकले होते. 

P. T. Usha

उषा या राज्यसभेच्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचा भाग असलेल्या पहिल्या नामनिर्देशित खासदार बनल्या आहेत. सभापती आणि उपसभापतींच्या अनुपस्थितीत त्या सभागृहाचे कामकाज चालवणार आहेत. तसेच त्यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्षपदी निवड झाली आहे.

SCROLL FOR NEXT