Jayshree Jadhav
Jayshree Jadhav 
फोटो फीचर

बलाढ्य भाजपला आस्मान दाखविलेल्या जयश्री जाधव नेमक्या आहेत तरी कोण?

सरकारनामा ब्युरो
Jayshree Jadhav

पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे (BJP) पराभूत उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली.

Jayshree Jadhav

२६ जून १९६५ रोजी आजरा येथे जयश्री जाधव यांचा जन्‍म झाला. वडील शंकरराव मोरे हे पेशाने डॉक्टर होते. जयश्री जाधव यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण आजऱ्यात पूर्ण केले. कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी आणि गृहिणी अशी त्यांची सहा महिन्यांपूर्वी ओळख होती. पण ३ डिसेंबर २०२१ रोजी चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. पतीच्‍या निधनाचे दु:ख बाजूला सारत जयश्री जाधव निवडणूक रिंगणात उतरल्‍या.

Jayshree Jadhav

राज्याच लक्ष वेधणारी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकुण १५ उमेदवार रिंगणात होते. यात महाविकास आघाडीकडून उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपकडून सत्यजित कदम यांच्यात चुरशीची लढत झाली.

Jayshree Jadhav

अखेर उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांनी बाजी मारली. या मतदारसंघातील त्‍या पहिल्‍या महिला आमदार ठरल्‍या आहेत.

Jayshree Jadhav

जयश्री जाधव यां विजयाने काँग्रेसने कोल्हापूर उत्तरचा गड आपल्याकडे राखत पालकमंत्री पाटील यांनी या कोल्हापुरवरील आपली पक्कड मजबूत असल्याचे दाखवून दिले.

Jayshree Jadhav

सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली होती. २६ टेबलांवरती २६ फेऱ्यांत ३५७ केंद्रावरील मतमोजणी करण्यात आली. यात अगदी पोस्टल मतांच्या फेरीपासूनच जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती. ती त्यांनी अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

Jayshree Jadhav

"अण्णा नाहीत याची मला खंत आहे. त्यांची मला पावलोपावली आठवण येईल. अण्णांच्या माघारी कोल्हापूरच्या स्‍वाभिमानी जनतेने त्यांचे स्वप्न पूर्ण केले. अण्णांनी जे पेरलं ते चांगलं उगवलं. आता त्‍यांचे काेल्‍हापूरच्‍या विकासाचे स्‍वप्‍न पूर्ण करायचे आहे,'' अशा भावना जयश्री जाधव यांनी व्यक्त केल्या.

Jayshree Jadhav

या निवडणू काँग्रेससोबतच भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली ताकद पणाला लावली होती. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अनेक दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडलं होतं. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही इथे प्रचार केला होता.

Jayshree Jadhav

या विजयाबद्दल बोलताना म्हणाल्या, गट-तट बाजूला ठेवून महाविकास आघाडी एकत्र आल्याचा मला जास्त आनंद आहे. माझ्या या विजयाचं संपूर्ण श्रेय महाविकास आघाडीसोबतच सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूरच्या जनतेला आहे. निवडणुकीत भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी मोठं मनदाखवायला हवं होतं, पण त्यांनी दाखवलं नाही. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी असून, आण्णांच्या माघारी त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. त्यामुळं आण्णांनी जे पेरलं, ते खरंच चांगलं उगवलंय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT