Hemant Rasane Sarkarnama
फोटो फीचर

Kasaba Bypoll: गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते नगरसेवक; कोण आहेत कसब्याचे हेमंत रासने?

Kasaba Bypoll Election: भाजप कडून उमेदवारी जाहीर झालेले हेमंत रासने कोण आहेत तुम्हाला माहीत आहे का?

सरकारनामा ब्यूरो
Hemant Rasane

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येथे भाजपने माजी नगरसेवक हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. 

Hemant Rasane

हेमंत रासणे हे सलग (2002, 2012, 2017) तीन वर्षे पुणे महापालिकेत नगरसेवक होते.

Hemant Rasane

त्यांनी पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. 

Hemant Rasane

सुवर्णयुग सहकारी बँकेचे ते अध्यक्ष आहेत.

Hemant Rasane

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेट हलवाई गणपती मंदिराचे विश्वस्त आहेत. त्यामुळे त्यांचा कसब्यात दांडगा जनसंपर्कही आहे.

Hemant Rasane

हेमंत रासने यांचा कसब्यातील गणेस मंडळांशी चांगला संपर्क आहे.

Hemant Rasane

भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अनेक वर्षांपासून रासने हे राजकारणात सक्रिय आहेत.

Hemant Rasane

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि खासदार गिरीश बापट यांचे ते निकटवर्तीय आहेत. तसेच त्यांच्या दांडगा जनसंपर्कामुळे कसबा मतदारसंघात उमेदवारी मिळाली आहे.

SCROLL FOR NEXT