PM Modi Special Blue Jacket :
PM Modi Special Blue Jacket :  Sarkarnama
फोटो फीचर

PM Modi Special Blue Jacket : पंतप्रधान मोदींच्या जॅकेटची का होतेय चर्चा? 'या' आहेत खास गोष्टी, पाहा फोटो

सरकारनामा ब्युरो
PM Modi Special Blue Jacket :

मोदी जॅकेट तर अलीकडच्या तरुणाईचीही फॅशन झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या धार्मिक दौऱ्यातून नव्हे तर अनेक गोष्टींमधूनही त्यांना असलेली वेशभुषांची आवड कायम दिसून येत असते.

PM Modi Special Blue Jacket :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खास जॅकेट घालून संसदेत पोहोचले. आता त्यांनी घातलेल्या या जॅकेटची चर्चा सुरु झाली आहे.

PM Modi Special Blue Jacket :

या जॅकेटची खास गोष्ट म्हणजे हे जॅकेट प्लास्टिकच्या बाटल्यांचा (PET) पुनर्वापर करून त्यांच्यासाठी खास हे जॅकेट बनवण्यात आले आहे.

PM Modi Special Blue Jacket :

6 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया एनर्जी वीक-2023 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांना हे जॅकेट भेट म्हणून देण्यात आले.

PM Modi Special Blue Jacket :

इंडिया ऑइलचे कर्मचारी आणि सशस्त्र दलांसाठी टिकाऊ कपडे बनवण्यासाठी 10 कोटींहून अधिक पीईटी बाटल्यांचा पुनर्वापर केला जाणार आहे.

PM Modi Special Blue Jacket :

तामिळनाडूतील करूर येथील श्री रेंगा पॉलिमर्स या कंपनीने पंतप्रधान मोदींसाठी एक जॅकेट तयार केले आहे.

PM Modi Special Blue Jacket :

असे जॅकेट तयार करण्यासाठी सरासरी 15 बाटल्या वापरल्या जातात. तर एक संपूर्ण गणवेश तयार करण्यासाठी सरासरी 28 बाटल्या वापरल्या जातात.

PM Modi Special Blue Jacket :

हे कपडे पूर्णपणे ग्रीन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. प्लास्टिकच्या बाटलीपासून बनवलेल्या कपड्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला रंग देण्यासाठी पाण्याचा थेंबही वापरला जात नाही.

PM Modi Special Blue Jacket :

या बाटल्या निवासी भागातून आणि समुद्रातून गोळा केल्या जातात. कपड्यांवर एक क्यूआर कोड आहे ज्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी स्कॅन केला जाऊ शकतो.

PM Modi Special Blue Jacket

टी-शर्ट आणि शॉर्ट्स बनवण्यासाठी पाच ते सहा बाटल्या वापरल्या जातात. एक शर्ट बनवण्यासाठी 10 बाटल्या आणि पेंट बनवण्यासाठी 20 बाटल्या लागतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT