vaibahv naik
vaibahv naik 
जिल्हा

आमदार वैभव नाईक यांचे आरोप ठरले खोटे : उपविभागीय अधिकारी निर्दोष

सरकारनामा ब्यूरो

ओरोस ः कुडाळ प्रांत वंदना खरमाळे यांना चौकशी समितीने निर्दोष ठरविले आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदारीकरणमध्ये बाधित नागरिकांना मोबदला देताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी त्रिसदस्य समिती नियुक्त केली होती. समितीने चौकशी अहवाल मंजूलक्ष्मी यांना सादर केला असून त्यात वंदना खरमाळे यांना निर्दोष ठरवित त्यांना हजर करून घ्यावे, असा अभिप्राय या समितीने दिला आहे.

कुडाळ प्रांत कार्यालयात महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या मालकांना शासनाने मंजूर केलेला मोबादला देण्यासाठी कुडाळ प्रांत पैसे मागीत असल्याचा आरोप आमदार नाईक यांनी केला होता. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही, असा इशारा देत नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानंतर 30 जूनला कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी चौकशीची लेखी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली होती.
तालुका प्रमुख नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात या प्रकारणाची ऑडियो क्‍लिप आहे. ज्या बॅंकेत हे पैसे जमा होणार होते, तेथील कर्मचाऱ्याने नुकसान रक्कम न मिळण्यात बॅंकेचा दोष नाही, प्रांत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी पैसे

मागत आहेत, असे सांगितले होते, असे नमूद केले होते. याची गंभीर दखल घेत मंजूलक्ष्मी यांनी दोन जुलैला चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यापूर्वी खरमाळे यांना दोन ते 30 जुलैपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भू संपादन अधिकारी वर्षा सिंगन, जिल्हाधिकारी कार्यालय लेखाधिकारी नितिन सावंत यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने खरमाळे यांना निर्दोष करत त्यांना कामावर हजर करून घेण्याची शिफारस केली आहे.

अहवाल सादर
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, ""चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. अहवालात मुंबई-गोवा महामार्ग मोबदला वाटपात दोष नसल्याचे चौकशी समितीचे म्हणणे आहे. तसे चौकशी अहवालात नमूद आहे, असे सांगितले.

खरमाळे हजर
चौकशी समितीने क्‍लिन चिट दिल्यानंतर व जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी सक्तीच्या रजेवर पाठविलेली 30 जुलै मुदत संपल्यावर प्रांत खरमाळे या कार्यालयात आजपासून हजर झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकांनाही त्या उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT