Yavatmal District Congress NCP Leaders Audio Clip Viral 
जिल्हा

'त्या' ऑडिओ क्‍लिपने राजकीय वर्तुळात भूकंप; कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दगाबाजांचे चेहरे उघड

उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजप विरोधी लाट असल्याने कॉंग्रेस उमेदवार विजय खडसे यांना विजयासाठी पोषक वातावरण असताना शेवटच्या क्षणाला कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. दोन महिन्यांचा कालावधीनंतर मतदारसंघातील एक माजी आमदार व भाजपचा मोठा पदाधिकारी यांच्यातील कॉंग्रेसचा पराभव का व कसा झाला, याबद्दल एक ऑडिओ क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

विनोद कोपरकर

महागाव (जि. यवतमाळ) : विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उमरखेड विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसला जबरदस्त पराभव पत्करावा लागला. दोन महिन्यांनंतर कॉंग्रेसचा पराभव का व कसा झाला? याबद्दल कॉंग्रेस व भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महाआघाडीतील घटक पक्षांच्या काही नेत्यांची नावे त्यात समोर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, वरिष्ठ त्यांच्यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजप विरोधी लाट असल्याने कॉंग्रेस उमेदवार विजय खडसे यांना विजयासाठी पोषक वातावरण असताना शेवटच्या क्षणाला कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. दोन महिन्यांचा कालावधीनंतर मतदारसंघातील एक माजी आमदार व भाजपचा मोठा पदाधिकारी यांच्यातील कॉंग्रेसचा पराभव का व कसा झाला, याबद्दल एक ऑडिओ क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

या क्‍लिपमध्ये भाजपला विजयासाठी छुपे सहकार्य करणाऱ्या महागाव तालुक्‍यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांची नावे उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी यासंदर्भात कुठलेही स्पष्टीकरण किंवा पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे हा झालेला त्यांच्यावरील आरोप खरा तर नाहीं ना, अशी चर्चा रंगत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून, हे कार्यकर्ते आपल्या नेत्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करीत आहेत. ढाणकी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचा उमरखेड येथील एक मोठा पदाधिकारी हाच फॉर्म्युला वापरून सत्ता बळकविण्याची खेळी खेळत आहेत. 

राजकारण खेळीमेळीने घ्यावे

राजकारणात आरोप प्रत्यारोप होतच असतात. परंतु, त्यात संबंध महत्वाचे मानून कॉंग्रेस नेता असलेल्या या माजी आमदाराने ओपिनियन पोलचा सर्व्हे पाहून भाजपच्या विजयाची चाहूल घेऊन राजकारणापेक्षा संबंध जपत भविष्यात हे संबंध सलोख्याचे राहतील, याची दक्षता घेतल्याचा प्रत्यय या संभाषणातून आला. परंतु, भाजपच्या त्या मोठ्या नेत्याने विजयाच्या शुभेच्छा स्वीकारत असताना आपण विजयश्री कशाप्रकारे खेचून आणली, याचे गौडबंगाल उघडकीस आणले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT