dilip walse patil on solapur tour
dilip walse patil on solapur tour  
जिल्हा

सोलापुरकरांना दिलेला शब्द फेब्रुवारीतही पाळणार 

सरकारनामा ब्युरो

सोलापूर  : कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील आज (शुक्रवारी) दुपारी चार वाजता सोलापुरात येणार आहेत.

केगाव येथील सिंहगड महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे विभागाच्या महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्‌घाटन पालकमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस पालकमंत्री वळसे-पाटील सोलापुरात असतील. 

शुक्रवारी स्पर्धेच्या उद्‌घाटनानंतर पालकमंत्री वळसे-पाटील रात्री शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील. शनिवारी (ता. 22) सकाळी 9 ते 11 या वेळेत अभ्यागतांच्या भेटी, वोरोनोको प्राथमिक शाळेत राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने सुरू असलेल्या रुक्‍मिणी यात्रेला सकाळी 11 वाजता ते भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पालकमंत्री वळसे-पाटील जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेतील.  

दुसरा दौरा 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्याने बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्याची सोलापूरच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाली आहे. महिन्यातून एकदा मी सोलापूरला येईन, असा शब्द पालकमंत्री वळसे-पाटील यांनी पहिल्या दौऱ्यात दिला आहे. जानेवारीत त्यांचा एक दौरा झाला, त्यानंतर आता फेब्रुवारीत दुसरा दौरा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT