Hassan Mushriff Chaired DPC Meeting in Nashik
Hassan Mushriff Chaired DPC Meeting in Nashik 
जिल्हा

नगर जिल्ह्याच्या विकासासाठी मागणार 971 कोटी : हसन मुश्रीफ

सरकारनामा ब्युरो

नगर : "जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे 971 कोटींची मागणी केली जाईल. आगामी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या 571 कोटी 80 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. नियोजन समितीच्या आराखड्यातील तरतूद करण्यात आलेला निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घ्या,'' असे स्पष्ट निर्देश ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मुश्रीफ म्हणाले, "जिल्हा नियोजनच्या 570 कोटी 81 लाख रुपयांच्या आराखड्यास 2019-20 करिता मंजुरी मिळाली होती. मंजूर निधीपैकी 340 कोटी 34 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यापैकी 284 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर कामांसाठी वितरित करण्यात आला. डिसेंबरअखेर खर्च झालेला निधी 196 कोटी 36 लाख आहे.''

''सन 2020-21 आराखड्यानुसार सर्वसाधारण योजनांसाठी 381 कोटी 39 लाख, आदिवासी उपयोजनांसाठी 46 कोटी एक लाख, अनुसूचित जाती उपयोजनांसाठी 144 कोटी 40 लाख, अशा 571 कोटी 80 लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता दिली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सात कोटी 50 लाख रुपये वितरित करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.'', अशीही माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT