नगर : ''नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षण व संवर्धनासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात कर्जमाफी देताना तीन लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. उर्वरीत दोन लाखांच्या वरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठीही विशेष योजना लवकरच मिळेल,'' असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात सांगितले.
प्रजासत्ताकदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाचे ध्वजवंदन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी तसेच सर्व अधिकारी या वेळी उपस्थित होते. या वेळी शानदार संचलन झाले. पद्मश्री पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार, बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मुश्रीफ म्हणाले, ''नगर जिल्ह्याने ऐतिकासिक, सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. यापुढे जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासासाठी निश्चित प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यात तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, ही काैतुकाची बाब आहे. जिल्ह्यात लवकरच विविध योजनांचा लाभ मिळणार असून, पशुधन जोपासण्यासाठी फिरते पशुचिकित्सालय सुरू होणार आहे. जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रश्न सोडविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी नुकसानभरपाई, कर्जमाफी देण्यात येईल. ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका क्षेत्रात स्वच्छतेवर विशेष भर दिला जाणार आहे. शाळांच्या इमारतींना निधी देऊन लवकरच सर्व शाळा दर्जेदार होतील.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.