Swami-&-Paricharak
Swami-&-Paricharak 
जिल्हा

सुधाकरपंत परिचारकांना  विधानसभेत पाठवा : खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी

सरकारनामा

मंगळवेढा : या भागातील रखडलेले प्रश्न  रखडलेले प्रश्‍न सोडवण्यासाठी वयाच्या 85 व्या वर्षी देखील तंदुरुस्त सुधाकरपंत परिचारक तुमच्या प्रश्न मार्गी लागू शकतील म्हणून त्यांना विधानसभेत पाठवावे असे आवाहन खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी  यांनी व्यक्त केले.

भाजपा,शिवसेना,रिपाई,महासंग्राम मित्र पक्षाचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारासाठी सिद्धापूर आरळी बोराळे नंदुर डोणज तांडोर तामदर्डी या भागातील  आयोजित सभेत  ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर चरणूकाका पाटील, दिनकर मोरे, शशिकांत चव्हाण, वामनराव माने, दाजी पाटील, युन्नूस शेख, शिवानंद पाटील, रयतक्रांती प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले, बापुराया चौगुले, जालिंदर व्हनुटगी, अण्णासो नांगरे पाटील, अप्पासाहेब पाटील, डॉ.आर.के.तोरवी,राजेंद्र लाड,गजानन चौगुले, रमेश कोळी, बाबासो बिराजदार आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना महास्वामी म्हणाले , चाळीस वर्षापासून अविरतपणे या भागाचा कायापालट करण्यासाठी सुधाकरपंतांनी काम केले असून अशा  निष्कलंक व्यक्तिमत्वाला विधानसभेत पाठवण्याची संधी मतदारांनी अवश्य साधावी  .  सत्तेची चावी हातात नसली तर  विकास कामाची तिजोरी खोलता येत नाही . "


"तालुक्याच्या रखडलेल्या योजना आणि प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाला विजयी करा . विकासपुरुष नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सत्तेत असणारा आमदार म्हणून परिचारक यांना मदत करा .  मतदारसंघाला गेल्या काही वर्षांपासून सत्तेत प्रतिनिधित्व मिळालेले  नाही त्यामुळे मतदारसंघातील विकास खुंटला. " असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT